गुहागर-गुहागर तालुक्याचा निकाल ९८.९८ टक्के

गुहागर-गुहागर तालुक्याचा निकाल ९८.९८ टक्के
Published on

गुहागर तालुक्याचा निकाल ९८.९८ टक्के
कला शाखा टक्केवारीत घट ः शास्त्र, वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांची भरारी
गुहागर, ता. २१ ः बारावीच्या परीक्षेत बसलेल्या ९९० विद्यार्थ्यांपैकी ९८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९८.९८ टक्के लागला आहे. शास्त्र आणि वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून कला शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली आहे.
विज्ञान शाखेत आबलोली हायस्कूलच्या ज्ञानदा दिपक संज्योत रेपाळ या विद्यार्थिनीने ८३.६७ टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेत शृंगारी उर्दू हायस्कूलच्या सामिया मुस्तफा साल्हेने ८८.३३ टक्के गुण आणि कला शाखेत पाटपन्हाळे हायस्कूलच्या सिद्धी रमेश सोलकर या विद्यार्थिनीने ७८.३३ टक्के गुण मिळवू तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. गुहागर हायस्कूलमधील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा निकाल ९८.९२ टक्के लागला. शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखेचा निकाल ८८.८८ टक्के लागला. गुहागर हायस्कूलच्या शास्त्र शाखेत १४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्त्त्तीर्ण झाले. यामध्ये सेजल चंद्रकांत गोरीवले (७७.६७ टक्के), साजिद अहमद साफी केळकर (७४.८३), नवदीप संतोष गमरे (७४.५) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
वाणिज्य शाखेत १०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ऋतुजा विठ्ठल अवेरे (८६.६७ टक्के), रिद्धी उदय धावडे (८४.०५), सेजल मनोजकुमार भेकरे (८३.३३ टक्के) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला. गुहागर हायस्कूलच्या कला शाखेतील २७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये आर्या मनोज पाटीलने ६८.३३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. महादेव राजेश शिंदे (६१.६७ टक्के) द्वितीय, तर सोनाली बाळकृष्ण कदम (५६.०५) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
श्रीमती रखमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाचा निकाल ९९.१५ टक्के लागला. यामध्ये साक्षी गुरव (६३.५० टक्के), सूरज बरागडे (६३.३३), आयुष वाडावे व सानिया कनगुटकर (६२.६७) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. वाणिज्य शाखेतून भाविका कृष्णा आंबेकर (७७.१७ टक्के), दीक्षा कृष्णा गावणंक (७५.१७), विक्रांत भोसले (७४.३३ टक्के) यांनी क्रमांक मिळवला. पालशेत हायस्कूलच्या कला शाखेतील प्रगती डिंगणकर, प्रतीक्षा मास्कर, संचिता मोरे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. पालशेत हायस्कूलच्या व्होकेशनल विभागात रुद्राक्षनाथ बिर्जे, पूर्वजा पाटील, समिप हळ्ये यांनी क्रमांक मिळवले.
न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९८.९९ टक्के लागला. शास्त्र आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के, तर कला शाखेचा निकाल ९७.०९ टक्के लागला. पाटपन्हाळे हायस्कूलमधील शास्त्र शाखेतून रिया बैकर, श्रावणी गमरे, सोनाली सकपाळ यांनी क्रमांक मिळवले.
तळवली हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेतू रुचिता सुवरे आणि नेहा लोंढे यांनी प्रथम, रोशनी समगीस्कर द्वितीय, अवंतिका कळंबाटेने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेतून सानिया जागडे, किमया कांबळे, नमिता लोंढे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले.
आबलोली हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला. ज्ञानदा रेपाळ, पायल अहिरे, सुकन्या मोरे, वाणिज्य शाखेत समिक्षा मालप, साक्षी मांडवकर व तेजस्वी बारस्कर, कला शाखेतून तेजस्वी झोरे, रियान घेवडे, साहिल वेले यांनी क्रमांक मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com