कुडाळ हायस्कूलची विधी प्रथम

कुडाळ हायस्कूलची विधी प्रथम
Published on

85009
85010

कुडाळ हायस्कूलची विधी प्रथम

बारावी परीक्षेत यश ः तालुक्याचा निकाल ९७.६९ टक्के


सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ ः तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.६९ टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण १८२४ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. यापैकी १७८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १८५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, प्रथम श्रेणीत ७२७ व द्वितीय श्रेणीत ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात प्रथम क्रमांक कुडाळ हायस्कूलची विधी शेट्टी (९४.५०, वाणिज्य), द्वितीय जांभवडे हायस्कूलची साक्षी कालेकर (९३.८३, वाणिज्य), तृतीय क्रमांक जांभवडे हायस्कूलची श्रध्दा मडव (९३.६७, वाणिज्य) हिने मिळविला.
शाखानिहाय प्रथम तीन क्रमांक असे ः कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज, कुडाळचा निकाल ९९.०९ टक्के लागला. विद्यालयातून ५५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा ः सेजल पवार (९० टक्के), वैष्णवी भोगटे (८६.६७), स्वप्नील हादगे (८५.१७) व युक्ती तेलंग (८५.१७). वाणिज्य शाखा-विधी शेट्टी (९४.५०), यशवंत सामंत (९२.८३), स्वराज ओटवणेकर (९०.३३). कला शाखा-शर्वाणी करंबळेकर (८८.८३), मृदुला देवगडकर (८८.५०), गंगाराम भोईप (८८.१७). व्होकेशनल शाखा-अनिश चेंदवणकर (८५.३३), दर्शन ठुंबरे (८३.६७), दिनेश करंबळेकर (७७.६७). स्वराज ओटवणेकर याने आय.टी. व सेजल पवार हिने गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविले.
जांभवडे हायस्कूल विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेतून ४२ पैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात अनुक्रमे साक्षी कालेकर (९३.८३), श्रध्दा मडव (९३.६७), हिमेश कदम (८८.६७) यांनी य़श मिळविले. विज्ञान शाखेतून ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम ममता गुरव (७६ टक्के), द्वितीय निखिल घाडीगावंकर (७४.३३), तृतीय क्रमांक पार्थ मेस्त्री (६८.३३) याने मिळविला. एम.सी.व्ही.सी. शाखेतून १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात परेश जांभवडेकर (७२.१७), ओंमकार मडव (७०.८३) व यश मडव (६८.१७) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूरतिठाचा निकाल ९९.६९ टक्के लागला. महाविद्यालयाचे ३२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखा-गणेश परब (७९.६७), राखी चव्हाण (७४ टक्के), भारती साळगावकर (७१ टक्के). विज्ञान शाखा-कोमल साटम (८७.१७), वेदिका प्रभू (८६ टक्के), मैथिली पालकर (८२.३३) टक्के व आर्या गवंडे (८२.३३) वाणिज्य शाखा-रसिका साळकर (९०.३३), अनुष्का मर्गज (८६.३३), तृतीय क्रमांक शंकर राणे (८३.८३).
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, साळगाव या कनिष्ठ महाविदयालयाचा संयुक्त शाखेचा निकाल ८९.१८ टक्के लागला. विद्यालयात संयुक्तमध्ये प्रथम क्रमांक सानिया गोडे (वाणिज्य, ७७.३३), द्वितीय अनिता परब (७६.१७) व तृतीय क्रमांक समीक्षा मांजरेकर (७५.६७) हिने मिळविला. कला विभागाचा निकाल ६९.२३ टक्के व वाणिज्य विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला विभागातून अनुक्रमे अनया घागरे (५६.३३), आदित्य हळदणकर (५३ टक्के), प्रथमेश देऊलकर (४९.१७) यांनी क्रमांक मिळविले. वाडोस हायस्कूलचा निकाल ९० टक्के एवढा लागला. या विद्यालयातून ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात वेदिका बागवे (८३.६७), संजना धुमक (७९.१७), जागृती पडकील (७५.३३) यांनी अनुक्रमे यश मिळविले. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाटचा निकाल १०० टक्के लागला. या विद्यालयातून १८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा-सार्थ पाटकर (८१.८३), अपूर्वा आरोलकर (७३.६७), भक्ती गावडे (७३.३३) व संपदा गावडे (७३.३३). वाणिज्य शाखा-राखी सामंत (८६.१७), चंदन पाटकर (८५ टक्के), सिध्दी खोत (८४.३३). कला शाखा-दीपाली केसरकर (७० टक्के), शिवराम नांदोसकर (६७.८३), रसिका पाटील (६४.८३).
श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव विद्यालयाचा निकाल ९३.१५ टक्के लागला. या विद्यालयातून १९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखा-अर्षद त्राया (७९.६७), ईश्वरी मोहिते (७७.५०), सिध्दी बोभाटे (७६.६७). वाणिज्य शाखा-देऊ राऊळ (८२.१७), प्रतीक सकपाळ (८०.८३), पद्मजा नांदोस्कर (७७.५०) व रसिका नाईक (७७.५०). कला शाखा-तन्नू कुमावत (८०.५०), आर्या सावंत (७०.५०). इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी-जयप्रकाश घाडी (७२.८३), तन्मय बांदेलकर (७२ टक्के), आदित्य मुंज (७१ टक्के). अकाऊंटिग, ऑफिस मॅनेजमेंट-साहिल भोगटे (६३.६७), विठ्ठल सावंत (६०.८३), दिनेश माणगावकर (५६.५०).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com