

.२२ (पाना ३ साठी, संक्षिप्त)
कुवारबावला टेम्पोचा अपघात
रत्नागिरी ः शहरातील कुवारबाव ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावर डी-मार्टसमोर टेम्पोचा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले. शहर पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गेल्या रविवारी (ता. १२) सायंकाळी घडली होती. संशयित मलिक मेहबुब गोरे (वय ३९, रा. आदर्शनगर, कारवांचीवाडी, रत्नागिरी) हे मालवाहू टेम्पो घेऊन पाठीमागे हौद्यात प्रवासी बसवून जात होते. टेम्पो रस्त्यावर उलटला. या अपघातात पंकज राजेंद्र मोरे (रा. रॉयलसिटी कारवांचीवाडी, रत्नागिरी), संदेश सुभाष भारती (३८, रा. गयाळवाडी खेडशी, रत्नागिरी) प्रकाश श्रीशैले कावाशी (२३, रा. तेरदाळा, कर्नाटक, सध्या रा. आदर्शनगर रत्नागिरी) हे जखमी झाले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------
निवेबुद्रुकमध्ये घरफोडी
रत्नागिरी ः निवे-बुद्रुक-तेली तांबळवाडी (ता. संगमेश्वर) येथे भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला. चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एक १ लाख ६७ हजाराचा ऐवज पळविला. याची नोंद देवरूख पोलिस ठाण्यात झाली. ही घटना शनिवारी (ता. १८) सकाळी नऊ ते दुपारी सव्वाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजाराम विठू चौगुले (वय ६२, रा. निवेबुद्रुक) हे मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा चालवतात. मोलमजुरी करण्यासाठी शनिवारी ते घर बंद करुन गेले होते. चोरट्याने भरदिवसा घराचा मागील दरवाजा उचकटून बेडरुमधील पेटीचे कुलूप तोडून पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविली. चौगुले दांम्पत्य दुपारी घरी आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये ५५ हजाराची सोन्याची चेन, ४० हजाराचा नेकलेस, ६ हजाराचे कानातील, ६ हजाराची सोन्याची अंगठी, २० हजार रोख असा १ लाख ६७ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी चौगुले यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.