

85033
टोपीवाला हायस्कूलची स्नेहलता प्रथम
मालवणात यश ः तालुक्याचा ९९.२० टक्के निकाल
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. परीक्षेसाठी तालुक्यातून ८७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत, ३२१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यात टोपीवाला हायस्कूलच्या वाणिज्य शाखेची स्नेहलता तेली (५६९) गुण मिळवून प्रथम आली आहे. याच शाखेची समृद्धी शेटये (५६८) गुण मिळवून द्वितीय तर कला शाखेची मानसी करलकर (५५५) गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, वराडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कट्टा, इ. द. वर्दम कला वाणिज्य कला कनिष्ठ महाविद्यालय, वराड आर्टस कॉमर्स ज्युनियर कॉलेज वराड, जयश्री वामन प्रभु आर्ट अॅन्ड कॉलेज, वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल या महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. महाविद्यालयनिहाय निकाल असा ः टोपीवाला ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२६ टक्के लागला. महाविद्यालयातून २७३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला ः मानसी करलकर (५५५), स्वप्नील कांदळगावकर (५०९), अनुष्का परब (४९१). वाणिज्य ः स्नेहलता तेली (५६९), समृध्दी शेट्ये (५६८), कामाक्षी काळसेकर (५५१). विज्ञान ः निनाद आरोंदेकर (४९३), रुद्र शिरोडकर (४८१), मैथीली हडकर (४७३) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष शरद परुळेकर, सचिव विजय कामत, कार्याध्यक्ष दत्तप्रसाद खानोलकर, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू यांनी अभिनंदन केले. भंडारी ज्युनियर कॉलेजचा निकाल ९९.२४ टक्के लागला. परीक्षेसाठी १३३ विद्यार्थी प्रविष्ठ झाली होती. त्यापैकी १३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला ः भाग्यश्री लाड (३९५), साक्षी सादये (३८४), साक्षी कुडाळकर (३६८). वाणिज्य-श्रावणी साळकर (५३५), ईशा चव्हाण (५१२), प्रीती सावंत (५०७). विज्ञान- कामिनी डगला (३७७), दिप्ती कुबल (३७६), जयश्री परब (३७५) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक हणमंत तिवले, संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर व संस्था पदाधिकारी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात परीक्षेस एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. कला शाखेमधून २६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला. यामध्ये क्षितिजा खरवते (८३.५०), वैदेही मंगेश ठाकूर (७२.१७), आदेश हाक्के (७२.१७) संदीप गावकर (६९.३३). वाणिज्य शाखेमधून ३५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले व निकाल १०० टक्के लागला. यज्ञा पडवळ (७५.३३), पूजा टक्के (७३.३३), रिया केळुसकर (६८.५०). सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. कनिष्ठ महाविद्यालयातून २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्वच्या सर्व २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमध्ये एकुण ५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. प्रतीक कासले (४४२), दिपाशा पवार (३१६), शुभम शिंदे (२६२). वाणिज्य शाखेमध्ये २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले. दिशा परब (५३३), साक्षी मेस्त्री (४८७), महादेव पारकर (४८२). वराडकर हायस्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य-सुनिल रावले (५१४), प्रतिक्षा मेस्त्री (५०९), राजकुमार दुखंडे (५०४). कला-रुपाली वायंगणकर (४२६), निकिता झोरे (४२५), काव्या मसुरकर (४०५), एकूण ११४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
------
मसुरेतील निकाल असा
आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे भरतगड. उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.५९ टक्के लागला आहे. तीन ट्रेडमधून प्रविष्ठ २७ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सागर धावडे (८०), केदार तांडेल (७८), हर्षद सांडव (७६.५०) यांनी यश प्राप्त केले. (कै.) सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. कला-छाया चव्हाण (३९५), यश खोत (३८३), वल्लभ जोशी (३७०). वाणिज्य-अक्षता नेमळेकर (५२४), शिवानी ठाकूर (५१८), साक्षी गुराम (५०४). वराडकर इंग्लिश स्कूल कट्टाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात रिया गोसावी (५४०), आनंदी परब (५१२), दीक्षा कदम (५०४) गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.