-सहा दिवसांच्या सर्चनंतरही पोलिस दिशाहीन

-सहा दिवसांच्या सर्चनंतरही पोलिस दिशाहीन
Published on

२३ (पान ३ साठी)


मिठगावाणेतील चोरीचा तपास सुरूच

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : राजापूर तालुक्यातील श्रमिक सहकारी पतपेढीच्या मिठगवाणे शाखेमध्ये झालेल्या जबरी चोरीचा अद्याप छडा लागलेला नाही. गेले सहा दिवस पोलिसांनी मिठगवाणे गाव, परिसर, जंगलभाग पोलिसांनी पिंजून काढला. परंतु त्यांच्या हाती लागलेले काही लागले नाही. स्थानिकांकडून काहीतरी माहिती मिळावी, यासाठीही पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
श्रमिक सहकारी पतपेढीच्या मिठगवाणे शाखेत धाडसी जबरी चोरी झाली. सुमारे ९० लाख रुपयांचे सुमारे २०० तोळे सोने चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. स्थानिक कनेक्शन असल्याशिवाय ही चोरी होणार नाही, याची शंका पोलिसांना असल्यामुळे स्थानिक संशयित कोण? यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे. चोरट्यांनी काहीतरी पुरवा सोडला असावा, यासाठी पोलिसांचे पथक गेली सहा दिवस मिठगवाणेसह परिसर पिंजून काढत आहे. रात्री, अपरात्री जंगलमय भागतही शोध मोहीम सुरू आहे.
चोरट्याने अतिशय हुशारीने ही चोरी केली आहे. सीसी टीव्ही स्टोअरेज बॉक्स देखील चोरट्याने काढून नेला आहे. त्यामुळे काहीतरी धागेदोरे मिळावेत, यासाठी पोलिसांनी स्थानिकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या चोरीसंदर्भात कोणालाही काही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com