-दोन दुचाकी चोरट्यांना चार दिवस पोलिस कोठडी

-दोन दुचाकी चोरट्यांना चार दिवस पोलिस कोठडी

२९ (पान ५ साठी)


- rat२२p१८.jpg-
P२४M८५१६१
राजापूर ः अणुस्कुरा जंगलात संशयितांची शोधमोहीम राबवताना आजींनी दिलेली पिठलं-भाकरी खाताना पोलिस कर्मचारी.
--------
चोरट्यांच्या शोधमोहीमेत आजीचा आधार

पोलिसांना दिले पिठल-भाकरी; दोघा संशयितांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी थरारक शोधमोहीम राबवून अणुस्कूरा घाटातील जंगलातून दोन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली. जगंलभागात पोलिसांना एका आजीने पिठलं भाकरी खाऊ घालून आधार दिला. न्यायालयाने दोघा संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील एका अल्पवयीन संशयिताची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याचे राजापूर पोलिसांनी सांगितले.
दोन दुचाकी चोरून कोल्हापूरच्या दिशेने पळून जाणारे तीन अनोळखी तरुण शनिवारी राजापूर तालुक्यातील ओणी येथे आले असता त्यांनी काही चारचाकी वाहनांना पिस्तुलसारख्या दिसणाऱ्या लायटरने धमकावण्याचा पयत्न केला. त्यानंतर आरडाओरड झाल्याने या तिघांनीही तेथून पळ काढत अणुस्कुरामार्गे कोल्हापूरच्या दिशेने गेले. याची माहिती रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला मिळाल्यानंतर अणुस्कुरा चेकपोस्ट येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. तिघे संशयित मोटरसायकलवरून अणुस्कुरा चेकपोस्टवर आले असता तेथील पोलिस नाकाबंदी पाहून दुचाकी सोडून येरडव, अणुस्कूरा जंगलामध्ये पळाले. त्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी जंगल परिसरात शोध मोहीम राबवली. त्यामध्ये एकजण पोलिसाना सापडला. तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अन्य दोघे जंगलात लपून बसले होते. शनिवार रात्रीपासून राजापूर पोलिस व आरसीपी टीमचे कर्मचारी जंगल परिसरात त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी सकाळी संशयित दोघे जंगलातून बाहेर येवून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना सापडले. दीपक श्रीमंदीलकर, अजय घेडगे (दोघे रा. अहमदनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
---------

आजीनी दिली पिठल भाकरी

ही घटना समजल्यानंतर राजापूर पोलिसांनी दिवसरात्र जंगलात संशयितांचा शोध घेतला. यामध्ये आरसीपी टीमने देखील मोलाची कामगिरी बजावली. ३६ तास हा शोध सुरू होता. या शोधमोहिमेदरम्यान पांगरी गावातील एका आजीने राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण व त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना पिठल, भाकरी आणि चटणी दिली. ती खाऊन पोलिस संशयितांचा शोध घेत होते. त्यांच्यासोबत उपनिरीक्षक सुधीर उबाळे, अमंलदार भीम कोळी व तुषार पाचलकर होते.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com