कणकवली शहरात डांसाचा प्रादुर्भाव

कणकवली शहरात डांसाचा प्रादुर्भाव

कणकवली शहरात
डांसाचा प्रादुर्भाव
कणकवलीः गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील गटारात पाणी साचत आहे. परिणामी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नगरपंचायत प्रशासनाने डांसाना मारण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. शहरातील काही इमारतींचे सांडपाणी रस्त्यावरील गटारात सोडले आहेत. यामुळे दुर्गंधी सुटली आहे. पावसामुळे पालापाचोळा कुजल्याने दुर्गंधी वाढत आहे.
--------------------
पर्यायी रस्त्यावर
विक्रेत्यांचे अतिक्रमण
कणकवलीः शहरातील उड्डाण पुलाखालील पर्यायी रस्त्यावर सध्या विक्रेत्यांचे अतिक्रमण सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेते आपली दुकाने थाटत असल्याने वाहने थांबवणे कठीण झाले आहे. सध्या मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जिल्ह्यात येत आहेत. पण, पर्यटकाना आपली वाहने रस्त्यार उभी करता येत नाहीत. जागोजागी फळांच्या गाड्या, भाजी विक्रेते व अन्य व्यावसाईकांनी रस्त्यावरच बाजार मांडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
-----------
नेत्रावती एक्सप्रेसला
कणकवलीत थांबा हवा
कणकवलीः एलटीटी येथून नेत्रावती एक्सप्रेस नियमित सकाळी ११.४० वाजता सुटते. या गाडीला रायगड जिल्ह्यात पनवेल, रोहा, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि रत्नागिरी या स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. मात्र, सिंधुदुर्गात केवळ कुडाळ स्थानकात थांबा आहे. ही गाडी बऱ्याच वेळेला कणकवली स्थानकात क्रासिंगसाठी थांबविली जाते. त्यामुळे नेत्रावती एक्सप्रेसला किमान कणकवली स्थानकात थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com