बसणी सोसायटीकडून दिवंगतांच्या कुटुंबीयांना मदत

बसणी सोसायटीकडून दिवंगतांच्या कुटुंबीयांना मदत

१६ (टूडे पान २ साठी)


rat२३p२.jpg-
२४M८५३१५
बसणी ः येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या दिवंगत सदस्याच्या पत्नीचे सात्वन व आर्थिक मदत सुपूर्त करताना सोसायटीचे चेअरमन जयवंत कदम सोबत अन्य सदस्य.

बसणी सोसायटीतर्फे दिवंगतांच्या कुटुंबीयांना मदत

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः शहराजवळील बसणी विविध कार्यकारी सेवा सोसायटी गेली ५९ वर्षे कार्यरत आहे. या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज पुरवठा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सोसायटीचे दिवंगत सभासदांच्या कुटुंबातील सदस्याला मदतीचा हात देणे सुरूच आहे. त्याचाही लाभ येथील सोसायटीच्या सभासदांच्या कुटुंबाला मिळत आहे.
सोसायटीकडून दिवंगतांचे अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत कली जाते. नुकतेच सोसायटीचे सभासद व प्रसिद्ध मिहीर फोटो क्लीकचे मालक संजय केशव मयेकर यांचे निधन झाले. सोसायटीचे संचालक मंडळाने तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच त्यांची पत्नी समृता संजय मयेकर यांचेकडे अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत सोसायटीचे चेअरमन जयवंत बापूराव कदम यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी सोसायटीच्या सदस्या मिनल प्रशांत बंदरकर, सुहासिनी सुरेश बारगोडे, व सदस्य, अनंत गणपत मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोसायटीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com