अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर पोलिसांशी संवाद

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर पोलिसांशी संवाद

१९ (टूडे पान २ साठी)

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यावर संवाद

जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन ; मुक्ता दाभोलकरांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः पोलिस मुख्यालयासह जिल्ह्यात पूर्णगड, नाटे, राजापूर, लांजा, देवरुख, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, गुहागर, दाभोळ, दापोली, खेड, मंडणगड या पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबाबत तेथील पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटील यांच्याशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी शंकाचे निरसनही करण्यात आले.
जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित संवाद कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, सामाजिक बहिष्कार, बुवाबाजीतून होणारी फसवणूक, शोषणाच्या घटना या जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यादृष्टीने अशा कार्यक्रमाचे आयोजन उपयुक्त ठरणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारी समिती सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानूष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा २०१६ या दोन्ही कायद्याबाबत माहिती दिली. या कायद्यांची आवश्यकता व उपयुक्तता विविध वास्तव घटनांची उदाहरणेही त्यांनी दिली. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, जादूटोणा विरोधी कायदा हा जारण-मारण, भूतप्रेत बाधा निवारण, अपत्य प्राप्तीबाबत दिशाभूल करून लोकांना फसवणूक करून पैसे उकळणाऱ्या बाबा, बुवा यांना पायबंद घालणारा आहे. संवाद कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य विनोद वायंगणकर यांनी काही चमत्कार प्रात्यक्षिके करून भोंदू कसे फसवतात हे स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हा अनिसचे कार्यकर्ते, अॅड. राधा वणजू, वल्लभ वणजू, मधुसूदन तावडे, प्रा. जयश्री बर्वे, शोभना कांबळे, अॅड. मधुमती कदम, प्रा. सोनाली कदम उपस्थित होते.
----
कोट
कायदा हा अंतिमतः सामान्य जनतेच्या हिताचा असतो. पोलिस यंत्रणा त्यासाठी काम करत असते. ते काम अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्यासाठी व अशा कायद्यांच्या उपयुक्ततेबाबत पोलिसांची मनोभूमिका तयार होण्यासाठी संवाद कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.
- धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com