मावळंगे, शिवधामापूरला वादळाचा फटका

मावळंगे, शिवधामापूरला वादळाचा फटका

३ (टूडे १ साठी)

- rat२३p२१.jpg-
२४M८५३७९
शिवधामापूर येथे वादळामुळे घराच्या पडवीचे छप्पर उडाले आहे.

मावळंगे, शिवधामापूरला वादळाचा फटका

अनेक घरांची कौले उडाली ; विद्युत पुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २३ ः संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर मावळंगे आणि करजुवे गावांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने २६ घरांचे नुकसान केले असून १५ विजेचे खांब कोसळले. त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. तो सुरळीत करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.
सलग दोन दिवस संगमेश्वर तालुक्यात संध्याकाळच्या दरम्याने मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे. मंगळवारी रात्री आणि बुधवारी सायंकाळी चक्रीवादळासह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे घराच्या वरील कौले, पत्रे उडून गेले. रात्रीच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे भीतीचे वातावरण होते. सर्वाधिक फटका शिवधामापूर येथील घारेवाडी आणि मोरेवाडीला बसला आहे. चक्रीवादळात विद्युत खांब कोसळल्याने तर काही खांब वाकल्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. विद्युत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ते खांब दुरुस्त करण्याचे काम हाती घेतलेले आहे. करजुवे येथील दत्ताराम गोविंद गेल्ये यांच्या घरावर झाड पडल्याने नुकसान झालेले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी तांबिटकर, कोतवाल भायजे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
संगमेश्वर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान होत आहे. या पावसाने शिवधामापूर, मानसकोंड, माभळे आदी गावांना वादळाचा फटका बसला. माभळे, घडशीवाडी येथील देवजी सदू घडशी यांच्या घरावर झाड पडल्यामुळे नुकसान झाले आहे. पावसाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मानस कोंड येथे खड्ड्यामध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्या गाड्या बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असली तरीही चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न केल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com