महोत्सवात एका दिवसात ७०० किलो कलिंगड विक्री

महोत्सवात एका दिवसात ७०० किलो कलिंगड विक्री

५ (टूडे १ साठी, अँकर)


- rat२३p२२.jpg-
२४M८५३८३
साखरपा : अक्षय साळवी यांनी केलेली कलिंगड लागवड

महोत्सवात एका दिवसात ७०० किलो कलिंगडाची विक्री

फुणगूसचा कृषी पदवीधर अक्षय साळवी ; दीड एकरात दीड लाख नफा

सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २३ : कोकण कृषी विद्यापीठात शेतीविषयक अभ्यासाचा उपयोग फुणगूस येथील अक्षय साळवी या तरूणाने अर्थाजनासाठी कसा करता येतो हे दाखवून दिले. तिन टप्प्यात केलेल्या कलिंगड लागवडीतून दीड लाखाचा नफा अक्षयने मिळवला. तसेच विक्रीसाठी गावातच महोत्सवाचे आयोजन करत एका दिवसात ७०० किलो कलिंगड विकली.
फुणगूस येथील अक्षय साळवी यांनी २०२१ साली कोकण कृषी विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी घेतल्यावर शहराची वाट न धरता ज्ञानाचा उपयोग अर्थार्जनासाठी करत शेतीमध्ये विविध प्रयोग सुरू केले. यंदा त्यांनी दीड एकर जमिनीत कलिंगड लागवड केली होती. डिसेंबरपासून तीन टप्प्यात अक्षय साळवी कलिंगड लागवड केली. तीन टप्प्यात १६ ते १८ टन कालिंगडांची विक्री झाली. यासाठी त्यांनी मेलोडी आणि अगस्ता या दोन जातींच्या कालिंगडांची लागवड केली होती. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता केवळ गांडूळ खत आणि अन्य सेंद्रिय खतांचा वापर केला. अडीच टन गांडूळ खत कलिंगड वेलांसाठी वापरले. तसेच ड्रिप पद्धतीने पाणी व्यवस्थापन करण्यात आले होते. ही सगळी विक्री स्थानिक बाजारपेठेतच करण्यात आली. फुणगूस बाजारपेठेवर आजुबाजूची सुमारे दहा ते बारा गावे अवलंबून असल्यामुळे त्याचा फायदा विक्रीसाठी झाला. साळवी यांचे भाजी विक्रीचे स्वत:चे दुकान आहे. तिथेही त्यांनी कलिंगड विक्री केली. हंगामाची सांगता एका कलिंगड महोत्सवाने झाली. गावातच त्यांनी हा महोत्सव आयोजित केला होता. या वेळी फुणगूससह डिंगणी, कोंडये अशा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी महोत्सवाला भेट दिली. महोत्सवाच्या एका दिवशी ७०० किलो कालिंगडाची विक्री झाली. या पध्दतीले विक्रीचा नवा फंडा अवलंबला आहे.

-------
दृष्टीक्षेपात

* कृषी पदवीधर युवकाचा कलिंगड लागवडीचा प्रयोग
* अगस्ता आणि मेलोडी जातीच्या कालिंगडाची लागवड
* दीड एकरातून दीड लाख निव्वळ नफा
* अडीच टन गांडूळखताचा आणि ड्रिपचा वापर
* स्थानिक बाजारपेठेत विक्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com