वादळी पावसाचा गणपतीपुळेला तडाखा

वादळी पावसाचा गणपतीपुळेला तडाखा

१८ (टूडे १ साठी, संक्षिप्त)

वादळी वाऱ्यासह
गणपतीपुळेत पाऊस

रत्नागिरी ः मुसळधार पावसाचा तडाखा तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रालाही बसला. बुधवारी सायंकाळपासून पावसाचे वातावरण झाले. त्यानंतर तासाभरातच वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली होती. सध्या पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अचानक पावसाने सुरवात केल्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. काहींनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र गुरुवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे आणि शासकीय सुट्टी असल्यामुळे पर्यटकांचा राबता आजही काही प्रमाणात आहे. परंतू पावसाचा येथील उद्योगधंद्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गणपतीपुळे आणि परिसरात रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणकडून योग्य वेळी खबरदारी न घेतल्यामुळे गणपतीपुळे परिसरात गेले दोन दिवस गोंधळ उडाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थ व लॉज व्यवसायी यांचे मोठे नुकसान झाले आहे.
--------
साखरपात सतत
विद्युत पुरवठा खंडित

साखरपा ः गेले आठवडाभर साखरपा गाव आणि परिसरातील गावांमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वारंवार होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे दाभोळे, कनकाडी परिसरात खांब पडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुन्हा एकदा साखरपा परिसरात झाडे पडल्यामुळे विद्युत पुरवठा सुमारे पाच तास खंडित झाला होता. पाऊस नसतानाही वारंवार विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. रात्रीच्यावेळी चार ते पाचवेळा विद्युत पुरवठा खंडित होतो.
-----------------

कामथेत पशुखाद्याचे
मार्गदर्शन शिबिर

चिपळूण : महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम विभागीय कार्यालय, रत्नागिरी व चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातर्फे पशुखाद्याचे मार्गदर्शन शिबिर कामथे येथे झाले. दुध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अजय काळे, चिपळूण संघाचे अध्यक्ष दिलीप माटे, व्यवस्थापक पाडुरंग कामळे उपस्थित होते. सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांना महामंडळामार्फत सुग्रास पशुखाद्य गोल्ड, एचपी पॅलेट, स्पेशल एचपी पॅलेट, सर्वोत्तम पॅलेट, महाशक्ती पॅलेट या पशुखाद्यांचा जनावरांच्या आहारात वापर करून कशा प्रकारे दुधाचे उत्पादन वाढवता येईल याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com