महिलांनी व्यवसाय, उद्योगात नाव कमवावे

महिलांनी व्यवसाय, उद्योगात नाव कमवावे

२७ (पान ४ किंवा ५ साठी)


-rat२३p२०.jpg-
२४M८५३७८
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करताना उद्योजिका कांचन चांदोरकर. सोबत प्राची शिंदे, शिल्पा सुर्वे व उद्योगिनी.
----------
महिलांनी उद्योगात नाव कमवावे

कांचन चांदोरकर ः रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे उन्हाळी प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : महिला उद्योजिका या नेहमी घरसंसार सांभाळून उद्योगात कार्यरत असतात. आमच्या जोशी फुड्स उद्योगामध्येही ५० जणांचे कुटुंब आहे. त्याप्रमाणेच रत्नागिरी ग्राहक पेठचेही एक सुरेख कुटुंब जमले आहे. महिलांना उद्योग, व्यवसाय, काटकसर, धनसंचय करण्याची वेगळी दृष्टी असतेच. त्यामुळे महिला उद्योजिकांनी या उद्योजकीय कौशल्यांचा विकास करून नाव कमवावे, असे प्रतिपादन जोशी फुड्सच्या संचालिका कांचन चांदोरकर यांनी केले.
रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे टीआरपी येथील अंबर हॉल येथे आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा सुर्वे, संयोजिका प्राची शिंदे, उद्योजक सुहास ठाकुरदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते. पल्लवी तावडे यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी सुहास ठाकुरदेसाई म्हणाले की, सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या प्राची शिंदे या महिला उद्योगिनींनीसाठी ग्राहक पेठेमार्फत प्रदर्शन आयोजित करतात. त्याला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो.
या प्रसंगी उद्योजिका कीर्ती मोडक, स्वाती सोनार, सौ. कीर यांनी मनोगत व्यक्त करून ग्राहक पेठेतून महिला उद्योगिनींना सुवर्णसंधी मिळते, याबद्दल अनुभव सांगितले. गेली अनेक वर्षे महिला बचत गट, महिला उद्योगिनींचे संघटन, एकत्रिकरण करत असल्याचे प्राची शिंदे यांनी सांगितले. सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. प्रदर्शनात कोकणी मेवा, खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, आयुर्वेदिक उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, साड्या, कुर्तीज, ज्वेलरी, हॅन्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, ड्रेस मटेरिअल्स, गारमेंटस्, मसाले, आदींचे स्टॉल लावण्यात आले आहेत. पर्यटक, रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
---------

महिलांसाठी विविध कार्यक्रम
उद्या (ता.२४) दुपारी ३.३० वा. फनी गेम्स, २५ ला दुपारी ४. ०० वा. आर्थिक उन्नतीसाठी योग्य गुंतवणूक कोठे करावी? यावर आर्थिक सल्लागार गुरुदत्त बागवे मार्गदर्शन करणार आहेत. २६ ला दुपारी ४.०० वा. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने डीजिटल मीडियाचा योग्य वापर यावर शिवांग साळवी मार्गदर्शन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com