महामार्ग वृक्ष लागवडीसाठी आत्मक्लेष आंदोलन

महामार्ग वृक्ष लागवडीसाठी आत्मक्लेष आंदोलन

३२ (पान ४ साठी)

महामार्ग वृक्ष लागवडीसाठी आंदोलन

जलदूत शाहनवाज शाह ; ५ जूनला उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणानंतर देशी वृक्ष लागवडीसंदर्भात महामार्ग विभाग तसेच कंत्राटदार कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनी येथील प्रांत कार्यालयासमोर आत्मक्लेष उपोषण करण्याचा इशारा येथील पर्यावरणप्रेमी, जलदूत शाहनवाज शाह यांनी महामार्ग कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
मुळात कोकण प्रभागात शासकीय वनक्षेत्र अत्यल्प आहे. खासगी जंगलातून परवाना व विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड चालूच आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून जाणारा मुंबई-गोवा रस्ता व गुहागर-विजापूर रस्त्याचे रुंदीकरण करताना फार मोठ्या प्रमाणात एक तर सिमेंटचे रस्ते बांधले जात आहेत. त्यातच भूजल पातळी वाढवणाऱ्या, तापमान कमी करणाऱ्या, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या जुन्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली आहे. याचा विपरित परिणाम अखंड कोकणात होत आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर ठेकेदारांनी अत्यंत अत्यल्प प्रमाणात साधारण १० टक्के लागवड केली ती सुद्धा परदेशी वृक्षांची. ४ जूनपूर्वी मुंबई-गोवा व गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण ते पोफळी दरम्यानच्या रस्त्यावर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खड्डे काढून स्थानिक प्रजातीची उंबर, पिपळ, वड, जांभूळ, पळस, ताम्हाणी, कडुलिंब, कदम, करंज, कवठ, कांचन भेंडी, आंबा, फणस जांभूळ अशा प्रकारची रोपे लावावीत. त्यांच्यासाठी जाळयाची व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा पर्यावरण दिनी आत्मक्लेष आंदोलन केले जाईल, असे शाह यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com