गोळप कट्टा

गोळप कट्टा

३९ (पान ५ साठी)


-rat२३p४२.jpg-
P२४M८५४४३
पावस ः गोळप कट्टाच्या कार्यक्रमात बोलताना फिजिओथेरपिस्ट डॉ. दिलीप पाखरे.
------------

प्रत्येक चांगल्या कामाची पोचपावती मिळतेच

डॉ. दिलीप पाखरे ःगोळप कट्ट्यावर उलगडला प्रवास
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २३ : माफक आहार आणि जास्त काम हे माझे धोरण आहे. ते धोरण आजपर्यंत तसेच आहे. त्यामुळेच प्रादेशिक मनोरुग्णालय असो वा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे नोकरी करताना चांगल्या कामाची पोचपावती मिळत गेली, असे प्रतिपादन फिजीओथेरीपिस्ट डॉ. दिलीप पाखरे यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे आयोजित कट्टाच्या कार्यक्रमात त्यांनी जीवनप्रवास उलगडला.
डॉ. पाखरे म्हणाले की, मी मुळचा वर्धा येथील आम्ही सात भावंडं. घरची परिस्थिती बिकट होती. वडील बोर धरण इथे माळीकाम करत होते. तिथे त्यांनी कर्तृत्वाने क्लार्कपर्यंत मजल मारली. मोठा भाऊ रेल्वेमध्ये नोकरीला लागल्यामुळे त्याच्यासोबत राहून विदर्भ, मध्यप्रदेश सिमा, नागपूरला शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या इच्छेखातर फिजीओथेरपीस्टसाठी प्रवेश घेतला. पुणे, नागपूर ऐवजी रत्नागिरीला पहिले पोस्टिंग स्वीकारले ते लोकमान्य टिळकांची जन्मभूमी पाहूनच. प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये नोकरीस सुरवात केली. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्युपेशनल थेरपी/फिजिओथेरपीला प्रवेश मिळाला.
डॉ. पाखरे यांनी सांगितले, १९७८ साली प्रादेशिक मनोरुग्णालयात तीन महिन्यांचे काम मिळाले. मुदतवाढ मिळून कायम झालो. मनोरुग्णालयात एक रुग्ण भजन म्हणताना दिसला. त्याला प्रोत्साहन देऊन रुग्णालयात भजन सुरू केले, अनेक खेळ सुरू केले. रुग्णांचे हस्तलिखित काढले. दर महिन्याला रुग्णांसाठी चित्रपट, रुग्णांची सहल, रुग्णांकडून राख्या बनवणे असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. उत्कृष्ट मनोरुग्णालय म्हणून रत्नागिरी रुग्णालयाचा अनेकवेळा गौरव झाला. या सगळ्या गोष्टीत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शाश्वत शेरे, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. १९९२ पासून जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत होतो. रुग्णालयातील चिंचेचे झाड नवीन इमारत बांधताना तोडायचे ठरले होते. माझ्या खंबीर विरोधामुळे ते झाड तोडण्यात आले नाही. आजही ते झाड अनेकांना सावली देते. नोकरी करतानाच आभार सांस्कृतिक मंडळ, संकल्प कलामंच, मंगलमूर्ती प्रतिष्ठान, कोमसाप अशा संस्थांमध्ये काम केले.
--------

मनोरुग्णांवर शोधनिबंध
मनोरुग्णालयात दाखल केलेले रुग्ण बरे झाल्यावर कुटुंबीय न्यायला तयार होत नाहीत हे कटूसत्य लक्षात आले. अनेक जणांचे पत्ते शोधून बरे झालेले रुग्ण कुटुंबांच्या स्वाधीन केले. १९७८ ते १९९० या काळातील मनोरुग्णालयातील रुग्णांच्या इतिहासावर शोधनिबंध लिहिला. त्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com