चिपळुणातील एकाला अटक

चिपळुणातील एकाला अटक

४९ ( पान ३ )

मोहोळातील जुगारा अड्डयावर छापा

कोटीचा मुद्देमाल जप्त, ३८ जण ताब्यात, चिपळुणातील एक जण

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण, ता. २३ : मोहोळ (जि. सातारा) येथील अनगर येथे एका दुमजली इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून ३८ जणांना पकडले. या कारवाईत रोख रकमेसह महागड्या मोटारी आणि किंमती स्मार्टफोन असा मिळून १ कोटी ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिपळूणमधील एका व्यक्तीला या कारवाईमध्ये अटक करण्यात आली आहे. जुगार खेळण्यासाठी या व्यक्तीने सातारा गाठले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याला अटक झाली.
या कारवाईत सुरत शहरासह चिपळूण, बीड येथील अनेक बडे व्यापारी आणि उद्योजक जुगार खेळताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका इमारतीत तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांना मिळाली होती. त्यानुसार खात्री करून त्यांनी तेथे पोलिसांच्या विशेष पथकाला सोबत नेऊन छापा टाकला. तेव्हा इमारतीच्या दोन्ही मजल्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले. या छाप्यात एकूण ३९ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाज बाशू मुजावर, दीपक गायकवाड (रा. मोहोळ), विनायक नीलकंठ ताकभाते, मनोज नेताजी सलगर, स्वप्नील कोटा, रोनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्णा अर्जुन काळे (रा. सोलापूर), ओंकार विजय चव्हाण, अबरार करीम फकीर (रा. चिंचनाका, चिपळूण, जि. रत्नागिरी), फारूख याकूब शेख (रा. सुरत, गुजरात), एकनाथ भगवान चांगिरे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), विलास धर्मराज कडेकर (रा. बडवणी, बीड), नितीन गुंड (रा. अनगर) यांचा समावेश आहे. या कारवाईत २ लाख २६ हजार रूपये रोकडसह सहा महागड्या कार आणि ४० मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ३ लाख ६९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com