मालवणात वाळूचे २४ रॅम्प उद्ध्वस्त

मालवणात वाळूचे २४ रॅम्प उद्ध्वस्त

85483
...........

मालवणात वाळूचे २४ रॅम्प उद्ध्वस्त
व्यावसायिकांत धडकीः ‘महसूल’ची सलग दुसरी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : तालुक्यातील अवैध वाळू उपशावरील कारवाईची मोहीम महसूल विभागाने तहसीलदार वर्षा झालटे यांच्या नेतृत्वाखाली सुरूच ठेवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हडी, मसुरे, डांगमोडे, वायंगणी, तोंडवळी येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणचे एकूण २४ रॅम्प महसूलच्या पथकाने उद्ध्वस्त करत कारवाई केली. अवैध वाळू उपशाविरोधात महसूल प्रशासन ''अॅक्शन मोड''मध्ये आल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
कोळंबचे मंडळ अधिकारी व त्यांच्या पथकाने बुधवारी (ता. २२) हडी येथील कालिका मंदिर नजीक खाडीपात्रात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे ५ दगडी रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. हडी चारपोल येथे ६ दगडी रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. हडी जुनी जेटी येथेही या पथकाने कारवाई करत येथे वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे २ दगडी रॅम्प व २ लोखंडी रॅम्प जमीनदोस्त केले. मसुरे मंडळ अधिकारी व पथकाने केलेल्या कारवाईत मसुरे-मर्डे येथे ७, डांगमोडे येथे १२ आणि कोईल येथे ५ असे एकूण २४ अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले जांभ्या दगडाचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले.
मंडळ अधिकारी आचरा व पथकाने तालुक्यातील वायंगणी-सडयेवाडी येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले जांभ्या दगडाचे २ रॅम्प, तोंडवळी मधली येथील १२ रॅम्प, तोंडवळी वरची (सुरुबन नजिक) ८ रॅम्प, तोंडवळी वरची येथील ३ रॅम्प आणि भगवंतगड येथील ५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com