मे फ्लावरला आवकाळीने बहर

मे फ्लावरला आवकाळीने बहर

१६ (टूडे पान ३ साठी, संक्षिप्त)


rat२९p२४.jpg -
२४M८६५६२
मे फ्लॉवर.

मे फ्लॉवरला
अवकाळीने बहर

साखरपा ः मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने फुटबॉल लिलीला (मे फ्लॉवर) बहर आला आहे. जागोजागी या फुलांचे गुच्छ फुललेले दिसत आहेत. त्यांच्या चेंडूसारख्या गोल आकारामुळे त्यांना हे नाव पडले आहे. या झाडाची उंची साधारण एक ते दीड फूट असून हे कंद एरवी जमिनीत निद्रिस्त असतात. पावसाच्या पाण्याबरोबर हे कंद वाढण्यास प्रारंभ होतो आणि पाने उगवण्यास सुरवात होते. पाठोपाठ फुलेही येतात. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे एका कंदापासून वर्षभरात एकदाच आणि एकच फूल येते. तीन ते चार दिवस हे फूल राहते आणि पुढे ते कोमेजून जाते. या फुलांचे नाव मे फ्लॉवर असले तरी ही फुले साधारणत: पावसाळ्यात फुलत असल्यामुळे कोकणात ही फुले बहुतांश वेळेला जून महिन्यातच फुललेली दिसतात; पण यंदा मे महिन्याच्या दुसऱ्‍या पंधरवड्यातच मोठा अवकाळी पाऊस पडल्यामुळे ही फुले नावाप्रमाणे मे महिन्यातच फुलली आहेत. लाल गुलाबी रंगाची ही फुले सध्या अनेकांच्या बागेत उमललेली दिसत आहेत.

--------


गजानन महाराज मंदिरात
उद्या चक्रीपारायण

रत्नागिरी ः शहरातील पॉवरहाउस येथील गजानन महाराज मंदिरात भूषण देसाई व सरोज देसाई यांच्या लग्नाच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. ३१) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत इन्फिगो आयकेअरमार्फत मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सकाळी १० ते ११ पर्यंत शुभेच्छा कार्यक्रम व त्यानंतर श्री दास गणूविरचित विजयग्रंथाचे सामुदायिक चक्रीपारायण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------

वालावलकर रुग्णालयात
फिटनेस लॅब उपलब्ध

खेड ः डेरवण येथील भ. क. ल. वालावलकर ग्रामीण रुग्णालयात हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि श्वसनासंबंधीच्या फिजिओथेरपी विभागात कार्डिओपल्मनरी रिहॅबिलिटेशन आणि फिटनेस लॅब उपलब्ध करण्यात आली आहे. या लॅबमधून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली आहे. रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हृदयाचा झटका पुनर्वसन, हृदयाची शस्त्रक्रिया पुनर्वसन, शस्त्रक्रियेपूर्वीची व नंतरची काळजी, दीर्घकालीन निरोगी फुप्फुसे, अस्थमा, पोस्ट कोविड पुनर्वसन, लठ्ठपणा व्यवस्थापन अशा सुविधा या लॅबमधून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोकणात अशा पद्धतीने उपचारसुविधा प्रथमच खूपच माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लॅबमधून घेतलेल्या उपचारांचे अनेक फायदे आहेत. तणाव, चिंता, नैराश्य कमी होते, हृदय आणि रक्तवहिन्यांचे स्वास्थ्य, वजन, कोलेस्टेरॉल कमी होते, हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या विकाराचा धोका कमी होतो, झोप नीट लागते, फुप्फुसांचे कार्य सुधारते, संतुलन सुधारते, चयापचय सुधारते, शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते असे अनेक फायदे या लॅबमधून घेतलेल्या उपचारांमुळे मिळते. याबाबत अधिक माहितीसाठी रुग्णांनी डॉ. अस्मा शर्मा, संकेत जांभळे, सचिन धुमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वालावलकर रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com