नव्वद टक्के बोटी मिरकरवाडा बंदरात स्थिरावल्या

नव्वद टक्के बोटी मिरकरवाडा बंदरात स्थिरावल्या

२० (टूडे पान २ साठी, मेन)

फोटो ओळी
- rat२९p१०.jpg-
P२४M८६५४८
रत्नागिरी ः शहरातील भगवती बंदर येथे कोसगार्ड बाजूला किनाऱ्यावर आलेल्या लहान बोटी.
- rat२९p११.jpg-
P२४M८६५४९
रत्नागिरी ः बोटी मिरकरवाडा जेटी येथे स्थिरावल्यानंतर त्यातील सामान खाली करुन जाळी सुकविण्यासाठी जाताना.
- rat२९p१६.jpg-
२४M८६५५४
रत्नागिरी ः मिरकरवाडा येथील किनाऱ्यावर बोट आणून तिची डागडुजी होत असताना.
- rat२९p१८.jpg-
P२४M८६५५६
रत्नागिरी ः मिरकरवाडा येथील शेवटच्या टप्यातील सुकी मच्छी सुकविली जात आहे.
- rat२९p१९.jpg-
२४M८६५५७
रत्नागिरी ः बोटीतील गॅस सिलेंडरची वाहतूक करताना कामगार.
- rat२९p२०.jpg-
२४M८६५५८
रत्नागिरी ः जाळ्यांचे ढीगच्या ढीग सुकविणास टेम्पोने वाहतूक केली जात आहे.
----------
मिरकरवाडा बंदरात नव्वद टक्के बोटी स्थिरावल्या

हंगाम दोन दिवसात संपणार ; साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छीमारांची कसरत

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ ः पावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील ९० टक्के बोटी बंदरात स्थिरावल्या आहेत. १ जून पासून मच्छीमारीला बंदी असल्यामुळे मच्छीमारांकडून आवरते घेण्यास सुरवात झाली आहे. किनाऱ्यावर आणलेल्या बोटीतील साहित्य काढून त्या साफ करत आहेत. बोटीतील जाळी सुकविण्यासाठी टेम्पोतून पाठविण्यात येत आहेत. बंदी कालावधी जवळ येत आहे, तशी मच्छीमारांची धावपळ वाढत आहे. बंदी कालावधी सुरु होण्यापुर्वी नौका बंदरात आणा अशी सक्त ताकीद प्रशासनाने मच्छीमारांना दिल्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
किनाऱ्यावरही सुखी मासळी सुकविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसामुळे त्यात व्यत्यय आला होता. सुकविलेली मच्छी पॅकींगसाठी पाठविली जात आहे. अलीकडे सुकी मच्छी पॅकिंग करून किलो-पावकिलोच्या दराने मिळते. त्याचा फायदा ग्राहक उठवत आहेत. त्यामध्ये बोंबील, सुरमई, वाकट्या, कोलीम, सुकी मास्ट चांगल्या प्रतिची बाजारात मिळत आहेत. जून महिना तोंडावर आल्याने शहराजवळच्या मिरकरवाडा, काळबादेवी, कासारवेली, साखरतर, कर्ला या ठिकाणी किनाऱ्यावर आणलेल्या बोटींच्या कामाला सुरूवात झाली आहे. किरकोळ काम करुन घेतली जात आहे. पुर्वी लाकडाच्या बोटी तयार करण्यात येत होत्या. सध्या त्यावर फायबरचा मुलामा येत असल्यामुळे बोटी चांगल्या टिकत आहेत. मात्र जाळ्यांची डागडूजी करावी लागत आहे. पावसाळ्यात मच्छीमार बांधव काम कमी करत असल्यामुळे ताफ्या-ताफ्याने जाळी दुरुस्त करत आहेत. त्यासाठी त्यांनी रोजगारही हजार ते बाराशे रुपयांपर्यत मिळत असतो. मिरकरवाडा येथील अनेक मंडळी एकत्र बसून ही जाळी विणण्याचे काम करत असतात.
-----
चौकट

शेवटच्या टप्प्यात दर वधारले

शेवटच्या टप्प्यात हर्णै बंदरात सुरमई, पापलेट, कोळंबीचे दर तेजीत होते. पापलेट बाराशे ते पंधराशे रुपये किलोने विकला गेला. त्यामुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै, मिरकरवाडा, साखरीनाटे, दाभोळ, राजीवडा आदी बंदरे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी दर दिवशी शेकडो मच्छीमारी बोटी ये-जा करीत असतात. परंतु मुळातच यंदा मासे फारच कमी असल्यामुळे दर वाढलेले आहेत. हर्णै बंदर हे मासेमारीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे इथे दर दिवशी मासे खरेदी-विक्रीची लाखोंची उलाढाल होते. आता हंगाम संपत आल्यामुळे दर खवय्याची निराशा झाली आहे.

---
कोट

सुरुवातीचा मासळी हंगाम हा खूपच तोट्यात गेला. त्यामुळे मत्स्य दुष्काळाची जाणीव झाली. परराज्यातील एलईडी, फास्टर आणि पर्ससीननेट नौकांचे अतिक्रमण सुरूच होते. शेवटचे दोन महिने चांगले गेले. गेल्या महिन्यात चालू कोळंबी बऱ्यापैकी मिळत होती. तर पापलेट मासळीचा जोर होता. त्यामुळे नौका मालकांना फक्त नोकरांचे पगार व्यवस्थित करता आले. मासळीला अजूनही पाहिजे तसा भाव मिळत नाही. सरकार दरबारी जसा उसाला हमीभाव दिला जातो, तसा मासळीलाही हमीभाव देणे गरजेचे आहे. दहा वर्षांपूर्वी कोळंबीचा दर २५० रूपये किलो होता. यंदा कोळंबीचा भाव २०० रूपये किलो आहे. दहा वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६० रूपये होता. आता १०० रूपये आहे.

- नंदकुमार चोगले, मच्छीमार, हर्णै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com