पेढे येथे 2 जूनला पर्यावरण व पर्यटन परिषद

पेढे येथे 2 जूनला पर्यावरण व पर्यटन परिषद

३० (पान ५ साठी)

पेढेत रविवारी पर्यावरण, पर्यटन परिषद

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : चिपळूण तालुक्यातील पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्रात कोकण पर्यावरण, पर्यटन परिषद व कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे २ जूनला सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विलास महाडिक यांचा सन्मान आमदार शेखर निकम यांच्या हस्ते केला जाणार आहे.
पर्यटन परिषदेसाठी महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त पुणे येथील महेंद्र घागरे, कोकण भूमी कृषि पर्यटन सहकारी पर्यटन संस्थेचे सचिव डॉ. मीनल ओक, राजू भाटलेकर, विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, धीरज वाटेकर, नंदू तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. तालुक्यासह कोकणचा शाश्वत विकास हा पर्यावरणस्नेही सर्वंकष पर्यटन उद्योग, व्यापार, उदीम, व्यवसाय यांच्या माध्यमातून प्राधान्याने साधला जाणार आहे. त्या दृष्टीने अधिक प्रमाणात या क्षेत्रात चळवळीस गतीमान चालना मिळावी या संबंधित क्षेत्रात अनेक व्यक्ती, संस्था, व्यावसायिकरित्या कृती प्रवण व्हाव्यात या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत संबंधित क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्ती, संस्थांतर्फे सादरीकरण, अनुभवकथन, मौलिक मार्गदर्शन होणार आहे. निसर्ग पर्यावरण, पर्यटन यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधावा या दृष्टीने निश्चित दिशा व वाटचाल या विषयानुषंगाने अमूल्य माहितीचा खजिना या परिषदेत उलगडला जाणार आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची थेट भेट, खुली चर्चा होणार आहे. या प्रसंगी कलम बांधण्याचे प्रात्यक्षिकही पाहण्यास मिळणार आहे. नावनोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी प्रकाश काणे, कैसर देसाई, धीरज वाटेकर, समीर कोवळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com