कातभट्टी

कातभट्टी

दापोलीत कात फॅक्टरीवर छापा
सांगोला वनविभागाची कारवाई : खैराच्या लाकडाच्या पुरवठ्याचा संशय
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ : सांगोला येथील वन विभागाच्या पथकाने विसापूर (ता. दापोली) येथील गुरुकृपा कात फॅक्टरीवर छापा टाकला. सांगोला येथून या फॅक्टरीमध्ये खैराच्या लाकडाचा बेकायदा पुरवठा होत असल्याचा वनविभागाला संशय आहे. या पार्श्वभूमीवर हा छापा टाकला आहे. सांगोला येथील वनक्षेत्रातून खैराची लाकडाची तस्करी करून कोकणात विक्री करणाऱ्या दोघांना सांगोला वनविभागाने अटक केली असून मोटारसायकल, वाहन, तोडलेले खैराचे लाकूड व कटर जप्त केले आहे.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने ही कारवाई केली आहे. सांगोला तालुक्यातील वनक्षेत्र असलेल्या गावामध्ये रात्री गस्त घालत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी व इतर वनअधिकारी यांना शनिवारी (ता. २५) बागलवाडी राखीव वनक्षेत्र गट नं २७२ मध्ये आठ खैर झाडांची तोड होत असल्याचे दिसून आले. पहाटे ३ च्या दरम्यान बागलवाडी वनक्षेत्रात आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोन आरोपी वनक्षेत्रात जागेवरच खैर लाकूड व कटर ठेवून पळून गेले. या आरोपींना पाठलाग करून महुद येथे वन अधिकाऱ्यांनी पकडले. संशयित आरोपी दतात्रय शिवाजी गोडसे (नरळेवाडी) व मारुती विलास गळवे (वाकी शिवणे (ढेंबरेवस्ती ता. सांगोला) यांची मोटारसायकल (एमएच ४५ एबी ०४४३) महुद येथे जप्त केली. वाकी शिवणे ढेंबरे वस्ती येथे सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान शक्ती जालिंदर ढेंबरे यांच्या वाहन (एम एच ४५ एएफ ९५३९) तपासणी केली असता खैर लाकडाचे १५ नग आढळून आले. खैर लाकडासह वाहन जप्त केले आहे. बागलवाडी व कटफळ येथील खैर लाकूड व कटर जप्त केला आहे. संशयितांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ३० मेपर्यंत वनकोठडी देण्यात आली होती. संशयित आरोपींची वनविभागाने सखोल चौकशी केली असता दापोलीतील काही कात फॅक्टरीला ते बेकायदा खैर पुरवत असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यानुसार हा छापा टाकला आहे. या कारवाईची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत रत्नागिरी वन विभागालासुद्धा नव्हती. सांगोला वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मुद्देमाल आणि पुरावा गोळा करण्यात सायंकाळी उशिरापर्यंत व्यस्त होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com