स्थानिक विकासात राजकारण नको

स्थानिक विकासात राजकारण नको

87176

स्थानिक विकासात राजकारण नको

नंदकुमार घाटे ः समाजहितासाठी कार्यरत राहणार

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः तरुणांनी शिक्षणामध्ये प्रगती साधली पाहिजे. प्रामाणिक व निःस्वार्थी वृत्तीने समाजसेवा तसेच राजकारण केल्यास जनतेकडून त्याची पोचपावती मिळते. स्थानिक विकासामध्ये कधीही राजकारण आणू नये. समाजहितासाठी मी यापुढेही कार्यरत राहणार, अशी ग्वाही येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते तथा उद्योजक नंदकुमार घाटे यांनी आज येथे दिली. विद्यार्थ्यांनी यशात सातत्य राखून उज्ज्वल भवितव्य घडवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
येथील राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांचा वाढदिवस तालुका पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. घाटे बोलत होते. यानिमित्ताने नुकत्याच झालेल्या माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, देवगड अर्बन बँक उपाध्यक्ष अभय बापट, भाई आचरेकर, दिवाकर परब, चंद्रकांत पाळेकर, शरद शिंदे, शामकांत शेटगे, कृष्णा परब, प्रकाश जोईल, जयराम कदम, बंटी वाडेकर आदी उपस्थित होते.
येथील देवगड अर्बन बँक, देवदुर्ग मच्छीमार सहकारी संस्था, अजिंक्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ आदी संस्थांच्यावतीने श्री. घाटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. घाटे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, श्री. घाटे यांनी शहरातील शिक्षण, आरोग्य, सहकार क्षेत्रातील विकासाचा धावता आढावा त्यांनी घेतला. चंद्रकांत पाळेकर यांनी प्रास्ताविक केले. अभय बापट यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com