आदित्य ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त ज्‍येष्‍ठांचा होणार सन्मान ः नाईक

आदित्य ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त 
ज्‍येष्‍ठांचा होणार सन्मान ः नाईक

87182

आदित्य ठाकरेंच्या वाढदिनानिमित्त
ज्‍येष्‍ठांचा होणार सन्मान ः नाईक

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १ : युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील ज्येष्ठ शिवसैनिक आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे. याबाबतची माहिती युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
श्री. नाईक म्‍हणाले, ठाकरे यांच्या वाढदिनानिमित्त ज्‍येष्‍ठ नागरिक पंधरावडा कार्यक्रम युवासेनेमार्फत घेतला जाणार आहे. यात ज्‍येष्‍ठ नागरिक आणि ज्‍येष्‍ठ शिवसैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला जाणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघनिहाय ज्येष्ठ शिवसैनिक व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान पंधरावडा होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्य तळागाळात पोहोचवले जाणार आहे. या बैठकीला यावेळी युवासेना जिल्हा उपप्रमुख मुकेश सावंत, कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, फरीद काझी, वैभववाडी तालुकाप्रमुख रोहित पावसकर, तळेरे शहरप्रमुख आदित्य महाडिक, युवासेना कणकवली समन्व्यक तेजस राणे, तालुका संघटक नीतेश भोगले, विभागप्रमुख संतोष सावंत, रोहित राणे, भोवड आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com