शिव स्वराज्य प्रतिमा , बोधचिन्ह खरेदी गाजणार

शिव स्वराज्य प्रतिमा , बोधचिन्ह खरेदी गाजणार

शिव स्वराज्य प्रतिमा , बोधचिन्ह खरेदी गाजणार

चार हजार रुपये दराने घेण्याचे फर्मान ; चिपळुणात सरपंचात नाराजी

सकाळ वृत्तसेवा ः

चिपळूण,ता. १ ः ३५०व्या शिवराज्याभिषेक निमित्ताने गेल्या ३ वर्षापासून ६ जूनला शासकीय कार्यालयात शिव स्वराज्यदिन साजरा केला जात आहे. या वेळी शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह शासकीय कार्यालयात दर्शनीभागात लावण्याचे आदेश देण्यात आलेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत शिव स्वराज्यदिनी शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह लावण्यात येणार आहे. ही प्रतिमा ४ हजार रुपये दराने संयुक्तीकपणे घेण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिक बाजारात ही प्रतिमा कमी दराने मिळत असतानाही एकाच एजन्सीकडून तो घेण्याचा खटाटोप काहींनी चालवला आहे; मात्र यावर सरपंच संघटनेने आक्षेप घेतला आहे.
शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने २०२२ पासून ६ जूनला शिव स्वराज्यदिन शासकीय कार्यालयात साजरा केला जात आहे. ६ जूनला ही गुढी उभारून ध्वज फडकवला जातो. गेली दोन वर्षे शिवराज्याभिषेकाची गुढी उभारत शिव स्वराज्यदिन साजरा करण्यात आला; मात्र या वेळी शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह लावण्याची सूचना शासनाने केली. या आधारे तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह एकाच एजन्सीकडून घेण्याचा खटाटोप सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पंचायत समितीमधील एका अधिकाऱ्याच्या आदेशाने या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायतींना स्थानिक बाजारपेठेतून साहित्य खरेदीची मुभा असताना ठराविक एजन्सीकडूनच खरेदीचा धाक कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिव स्वराज्य प्रतिमा नेमकी किती आकाराची घ्यावी, याची स्पष्टताही शासननिर्णयात नाही. त्यामुळे ५०० ते २ हजार रुपयांना मिळणारी ही प्रतिमा ४ हजार रुपये दराने घेण्याचा घाट कशासाठी, असा सवाल केला जात आहे. वरिष्ठांच्या अलिखित आदेशाला विरोध केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी निमूटपणे त्याला होकार दिल्याची कुजबूज सुरू आहे.

------
स्वराज्य प्रतिमेची खरेदी गाजणार

अलिकडच्या काळात आर्थिक लाभापायी काही ठिकाणी तालुकास्तरावरच सेंट्रलाईज खरेदीची संकल्पना रूढ होत चालली आहे. वरिष्ठांचा अलिखित आदेश असल्याने अव्वाच्यासव्वा किमंतीला वस्तू खरेदी करावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायतीकडून होणारी स्वराज्य प्रतिमेची खरेदी गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
..............
कोट
लोकांचा पैसा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोककल्याणासाठी वापरला जातो. त्यामुळे या निधीचा योग्य विनियोग व्हायला हवा. शिव स्वराज्य प्रतिमा व बोधचिन्ह जिथे कमी दराने मिळेल तिथून ते घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकच व्यक्ती अथवा संस्थेकडून खरेदीसाठीचा तगादा लावणे ते योग्य ठरणार नाही.
- योगेश शिर्के, अध्यक्ष - चिपळूण तालुका सरपंच संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com