डोळे स्कॅन करूनही मिळणार रेशन

डोळे स्कॅन करूनही मिळणार रेशन

डोळे स्कॅन करूनही मिळणार रेशन

नवीन ‘बेस फोरजी पॉस मशिन’; २ लाख ७९ हजार कुटुंबे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : ई- पॉस मशिनवर अंगठा मॅच झाला नाही, तुम्हाला धान्य मिळणार नाही, असे म्हणण्याची वेळ आता रास्त धान्य दुकानदारांना येणार नाही. कारण, बेस फोरजी पॉस मशिन प्रत्येक रेशन दुकानात दिली आहे. यामध्ये आयस्कॅनरची (डोळे स्कॅन) सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्याची सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था हायटेक झाली असून, एकही लाभार्थी आता रेशनपासून वंचित राहणार नाही.
जिल्ह्याची सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. नागरी व पुरवठा मंत्रालयाकडून सर्व रास्त धान्य दुकानदारांना बेस फोरजी पॉस मशिन दिली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या ई-पॉस मशिनमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. त्यामुळे त्याबाबत लाभधारकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यावर जिल्हा पुरवठा विभागाने अनेक उपाययोजना केल्या. तरी अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित राहात होते. त्यात ई-पॉस मशिन मुदतबाह्य झाल्यामुळे त्या जमा करण्यात आल्या होत्या. त्या बदल्यात नवीन बेस फोरजी पॉस मशिन पुरवण्यात आल्या. अनेकवेळा वयोवृद्ध लाभार्थीच्या हातांचे ठसे जुळत नाहीत. त्यामुळे पॉस मशिनवर आधारकार्ड देऊन धान्य घेताना अनेकदा अडचणी येऊ लागल्या असून, धान्यापासून काहीवेळा वंचित राहावे लागत होते; परंतु आता डोळे स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली असल्याने सर्व कार्डधारकांना धान्य मिळणार आहे.
-----------

जिल्ह्यात २ लाख ७९ हजार १२९ लाभार्थी
जिल्ह्यातील अंत्योदय गटातील ३८ हजार ७०५ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील २ लाख ४० हजार ४२४ कार्डधारक अशा एकूण २ लाख ७९ हजार १२९ कुटुंबांना शासनाच्या रास्त दर धान्याचा लाभ मिळत आहे.
------------
कोणत्या तालुक्यात किती आहेत कार्डधारक

मंडणगड - ११,९५१
दापोली - ३२,७४०
खेड - ३४,०२९
चिपळूण - ४२,५२८
गुहागर - २१,९५८
संगमेश्वर - ३६,५१८
रत्नागिरी - ५२,०३९
लांजा - १८,८७७
राजापूर - ३०,२२९
-----------------------------
एकूण - २, ७१, १२९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com