साखरपा-मेघीत वादळात पडलेल्या झाडांची राजरोस उचल

साखरपा-मेघीत वादळात पडलेल्या झाडांची राजरोस उचल

rat1p16.jpg
87222
साखरपा ः मेघी येथून तोडून एकत्र केलेल्या झाडांची पाहणी करताना माजी सरपंच प्रमिल चव्हाण आणि पोलिसपाटील विजित साळवी.

वादळात पडलेल्या झाडांची
मेघीत राजरोस उचल सुरू

वनखात्याने हात झटकले; सरपंचांनाही दिली नाही दाद

साखरपा, ता. १ : नजीकच्या मेघी येथे वादळात उन्मळून पडलेल्या झाडांची राजरोस चोरी होत असल्याची घटना उघड झाली आहे. गावातील एक स्थानिकच ही चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
मागील आठवड्यात वळवाचा पाऊस झाला. त्यावेळी झालेल्या वादळात रस्त्याकडेची झाडे मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडली. ही झाडे एक स्थानिक लाकूड व्यापारी परस्पर तोडून नेत असल्याचे माजी सरपंच प्रमिल चव्हाण आणि शिवसेना शाखाप्रमुख प्रणित बेटकर यांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी त्या व्यापाऱ्याला विचारणा केली असता, त्याने बांधकाम खात्याला विचारून झाडे तोडली असल्याचे सांगितले. त्यावर चव्हाण यांनी बांधकाम खात्याशी संपर्क साधला असता, या रस्त्यांची जमीन ही शासनाने अधिग्रहित केली नसल्याने ती झाडे, जमीन खासगी असल्याचे सांगण्यात आले. त्यावर वन अधिकाऱ्यांनी गावात येऊन पाहणी करावी, अशी विनंती चव्हाण यांनी केली; पण वनखात्यातील लोकांनी माकड मोजणीचे कारण सांगत शुक्रवारी घटनास्थळी येण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर तोडलेली सर्व झाडे शनिवारी त्या पाऱ्याने उचलून एका ठिकाणी ठेवली. त्यानंतरही चव्हाण यांनी वनखात्यास कळवले असता, सुटीचे कारण देत गावात येण्यास नकार दिला. दरम्यान, मेघी पोलिसपाटील विजित साळवी यांनी गावात जाऊन तोडून एकत्र केलेल्या लाकडांची पाहणी केली.
--------------
चौकट
कोणी अचानक कसा नेतो?
या सगळ्या प्रकाराबाबत प्रमिल चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. खासगी जमिनीतील झाडे कोणी अचानक कसा नेऊ शकतो, असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊनही वन अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. एकाच दिवशी सगळ्या वनखात्याला सुटी कशी?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com