शीळ धरण ते जॅकवेल  ५५ मीटर पाईपलाईन पूर्ण

शीळ धरण ते जॅकवेल ५५ मीटर पाईपलाईन पूर्ण

२८ (पान ३ साठीमेन)

शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन पूर्ण

जलवाहिनी ५५० मीटर जलवाहिनी; काम वेळेत पूर्ततेसाठी शिवसेनेची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे रखडलेले काम वेगाने सुरू झाले आहे. एकूण ५५० मीटर जलवाहिनीपैकी आतापर्यंत ५५ मीटर काम पूर्ण झाले आहे. पालिकेकडून होणार हे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक व विद्यमान पदाधिकारी स्वतः लक्ष घालून आहेत. कालच त्यांनी घटनास्थळावर जाऊन कामाची पाहणी केली.
रत्नागिरी शहरामध्ये सध्या पाण्याची टंचाई आहे. शहरवासीयांना शीळ धरणातील खालावलेल्या पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शीळ धरण ते पंपिंग हाऊसपर्यंत पाईपलाईन टाकण्यास झालेल्या विलंबाबाबत शहरवासीयांकडून ओरड सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या जलवाहिनी जोडण्याच्या कामाची शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी पाहणी केली. नळपाणी योजना पूर्ण झाली असताना पंपिंग हाऊसपर्यंत लाईन पूर्ण होणे आवश्यक आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी देखील हा विषय उचलून धरला. ज्या फ्लोटिंग पंपाद्वारे सध्या जॅकवेलमध्ये पाणी लिफ्ट केले जाते, तो फ्लोटिंग पंप अतिवृष्टीत वाहून गेला तर शहरावर पाणी संकट येण्याच्या भीतीने हा विषय उपस्थित करण्यात आला. शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम अधिक वेगाने व्हावे, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शीळ धरणाला भेट दिला. शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी ज्येष्ठ नगरसेवक राजन शेटय़े, सुदेश मयेकर, विकास पाटील, विजय खेडेकर, अभिजित दुड्ये आदी उपस्थित होते. तेथील संरक्षक भिंत, जलवाहिनी या कामाची पाहणी केली.

५५ मीटर वाहिनीचे काम पूर्ण
एकूण ५५० मीटर जलवाहिनीपैकी ५५ मीटर वाहिनी टाकून पूर्ण झाली आहे. त्यासाठी नवीन पाईपलाईन उपलब्ध आहे. अजून ४६० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम बाकी आहे. हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com