डावखरे बारा वर्षांत दिसले का?

डावखरे बारा वर्षांत दिसले का?

87250

डावखरे बारा वर्षांत दिसले का?

अभिजीत पानसेंची टीका ः व्हिजन घेऊन निवडणूक रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ : पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून गेल्या बारा वर्षांपासून असलेले निरंजन डावखरे तुम्हाला कधी दिसले का? असा प्रश्न मनसेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी आज येथे केला. केवळ पाकिटे आणि आब्यांचे बॉक्स पाठवून त्यांनी आपला कार्यकाळ घालवला. रोजगाराचे व्हिजन घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. येथील मतदारांनी माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहावे. गेल्या पंधरा-वीस वर्षांत कोकणावर अनेक नेत्यांनी राज्य केले; मात्र येथील रोजगार, पर्यटन, पर्यावरण आणि विकासावर पुढच्या वीस वर्षांचा विचार करून एकानेही रोल मॉडेल तयार केले नाही किंवा त्या पध्दतीने काम केले नाही. त्यामुळे कोकणाचे प्रश्न अधांतरीच राहिले, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या श्री. पानसे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. प्रक्वत्या अनिशा माजगावकर, दिलीप कदम, जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सनी बागकर, वेंगुर्ले महिला तालुकाध्यक्ष स्नेहा कुडाळकर, उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर, चिन्मय नाडकर्णी, सिद्धेश आकेरकर, विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष ओमकार कुडतडकर, आंबोली विभाग अध्यक्ष काशिराम गावडे, विजय बांदेकर, अक्षय पिळणकर, प्रतीक मालवणकर, प्रशांत कुडाळकर, सहदेव फोडनाईक, रोहित माकले, साहिल कोळंबेकर, स्मित कामटेकर, अभिषेक जाधव, सूरज पालकर, स्वप्नील टकेकर, रोशन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पानसे म्हणाले, ‘‘कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे बारा वर्षे आमदार होते. या काळात ते कधी दिसले का? मी दिग्दर्शक, लेखक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. माझे वडील गेली ४५ वर्षे संशोधन करत आहेत. मुलांच्या भविष्यासाठी ते काम करत आहेत. जगभरात रचनावादी शिक्षण पद्धत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य आधारित शिक्षण आणण्याचे धोरण स्वीकारले आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण आणून विद्यार्थ्यांना उद्योग, व्यवसाय सुरू केले पाहिजेत. पुढील २० वर्षांचे विकासाचे धोरण तयार करताना कोकणच्या मातीशी निगडित उद्योग, व्यवसाय धोरण स्वीकारले पाहिजे. पर्यावरण आणि पर्यटन विकासाचे शिक्षण दिले पाहिजे. मी वचननामा, जाहीरनामा देणार नाही, तर रोजगारनामा आणणार आहे.’’
................
चौकट
युतीचा प्रश्नच उद्भवणार नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला ‘जिंकून ये’ असे आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत युतीचा प्रश्न येणार नाही, असे अभिजीत पानसे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com