एस.टी.च्या वर्धापनदिनी 
तळेरे स्थानकात वृक्षारोपण

एस.टी.च्या वर्धापनदिनी तळेरे स्थानकात वृक्षारोपण

87257
एस.टी.च्या वर्धापनदिनी
तळेरे स्थानकात वृक्षारोपण

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ : महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाचा १ जून हा ७६ वा वर्धापन दिन राज्यात साजरा करण्यात येत आहे. येथील बसस्थानकात आज एस.टी. महामंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त तळेरे पंचक्रोशीत पत्रकार मित्र परिवार आणि निसर्गमित्र परिवार या संस्थांच्यावतीने वाहतूक नियंत्रक अविनाश दळवी यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
बसस्थानकात आकर्षक शुभेच्छा फलक लाऊन प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या. वर्धापन दिनानिमित्त वाहतूक नियंत्रक दळवी यांची भेट घेऊन बसस्थानकाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात निसर्गमित्र परिवाराच्यावतीने बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्याची संकल्पना मांडली. त्याला दळवी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मारकड, निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष पत्रकार संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, सुनील तळेकर वाचनालयाचे अध्यक्ष व माजी सरपंच विनय पावसकर, माजी सरपंच प्रवीण वरुणकर, माजी सरपंच शशांक तळेकर, कन्हैया भांबुरे, स्वच्छता कर्मचारी सुमित्रा कांबळे, चालक पी. सी. कुबडे, डी. जी. जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com