पावस-गणेशगुळे समुद्रकिनारा झाला स्वच्छ

पावस-गणेशगुळे समुद्रकिनारा झाला स्वच्छ

87315
87314

गणेशगुळे समुद्रकिनारा झाला स्वच्छ
पोलिस, व्यावसायिक, ग्रामस्थांचा सहभाग ; पर्यटकांचे स्वागत
पावस, ता. २ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत समुद्रकिनारी स्वच्छता ठेवून पर्यटकांना बिनधास्तपणे समुद्रसफरीचा आनंद मिळावा याकरिता गणेशगुळे समुद्रकिनारी स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, पोलिसपाटील, सरपंच, पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे अंमलदार आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे किनाऱ्याची स्वच्छता केली.
उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशगुळे येथील सुरक्षित समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर समुद्रसफराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांच्या गाड्या किनाऱ्यावर येतात. त्यांच्या स्वागतासाठी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार, गावातील हॉटेल व्यावसायिक आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून समुद्र स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये सरपंच श्रावणी रांगणकर, पोलिसपाटील संतोष लाड, सेलिब्रिटी मेघा घाडे आणि तीस ते चाळीस ग्रामस्थ, हॉटेल व्यवसाय यांच्या माध्यमातून समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला.
या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरीकर यांनी या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच प्रत्येक पर्यटकांनी हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थांनी स्वच्छतेचा पाढा आपल्यापासून सुरवात केल्यास प्रत्येकजण आपोआप त्यामध्ये सहभागी होईल, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com