चिपळूण-भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध

चिपळूण-भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध

rat2p2.jpg
87292
चिपळूणः शहरातील दळी भातबियाणे विक्री केंद्रातून भातबियाणे विकत घेताना ग्राहक.
--------------

भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध
शेतकऱ्यांमधून समाधान; शेतकऱ्यांची लगबग
चिपळूण, ता. २ : पेरणीची कामे वेळेत व्हावीत यासाठी चिपळूण तालुक्यातील दुकानात भातबियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बियाणे व इतर शेतीविषयक खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यावर्षी भातबियाण्याच्या दरात २०० रुपये प्रतिबॅग वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने भातपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिक लागवड करण्यात येते. यापैकी चिपळूण तालुक्यात १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. यावर्षी वेळेत बियाणे उपलब्‍ध झाल्याने बियाणे खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भातबियाण्याचा पुरवठा तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांकडे झाला आहे. भातबियाण्यामध्ये महाबीज व खासगी कंपनीचे संकरित व सुधारित भातबियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. मान्यताप्राप्त परवानाधारक विक्रेत्यांकडे बियाणे विक्रीला ठेवण्यात आली असून, शेतकऱ्यांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
तालुक्यात हळवा, निमगरवा व गरवा या प्रकारातील बियाणांची लागवड होत असल्याने तशी बियाणे बाजारात आली आहेत. पारंपरिक व सुधारित बियाणे उपलब्ध आहेत. सुवर्णा, जया, कर्जत-२, रत्नागिरी ८, वाडा कोलम, चिंटू, साईराम, ज्योतिका, श्री १०१, अभिरूची, रूपाली, कोमल, सोनम, वैष्णवी, पूजा, तृप्ती, शुभांगी इ. सुधारित व संकरित अशा अनेक प्रकारच्या जातीची बियाणे विक्रीस उपलब्ध आहेत.
वाडा कोलम तांदळाला मागणी असल्याने व भाव चांगला मिळत असल्याने तालुक्यात हे बियाणे अधिक प्रमाणात उपलब्‍ध झाले आहे. बियाणांच्या दरात यावर्षी वाढ झाल्याने पारंपरिक सुवर्णा बियाणाच्या २५ किलोच्या बॅग दरात वाढ झाली आहे. तालुक्यात खते व बियाणांसाठी अधिकृत विक्रेते असून, तेथूनच खतबियाणे खरेदी करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
--------------
कोट
बियाणे वेळेत आल्याने शेतकरी पेरणी वेळेत करू शकणार आहे. बियाण्यांच्या दरात यंदा वाढ झाली असून, पारंपरिक सुवर्णा वाणाला मागणी जास्त आहे.
- राजेंद्र दळी, बियाणे व शेती साहित्य विक्रेता
-----------
चौकट
बियाणांचे दर प्रतिबॅग रुपयांत
सुवर्णा - १४०० ( २५ किलो)
जया- १४०० (२५ किलो)
वाडा कोलम -१२५०( १० किलो)
इंद्रायणी - १८०० (२५ किलो)
साईराम - ७५० (५ किलो)
रत्नागिरी ८ - ७५० (१० किलो)
कर्जत २ -७५० (१० किलो)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com