चिपळुणातील गटारांवरील अतिक्रमण हटविणार

चिपळुणातील गटारांवरील अतिक्रमण हटविणार

चिपळुणातील गटारांवरील अतिक्रमण हटविणार
पालिकेच्या हालचाली; व्यापाऱ्यांचे समर्थन
चिपळूण, ता. २ः पुढील दोन दिवसांत चिपळूण पालिका प्रशासनाकडून शहरातील गटारांवरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहेत. बाजारपेठेतील काही व्यावसायिक व दुकानदारांनी कडप्पे व लेंटल टाकून ही गटारे झाकली आहेत. यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी प्रशासनाकडून ही करवाई केली जाणार आहे.
शहरात बहुतांशी व्यापाऱ्यांनी आपल्या दुकांनासमोर असलेल्या गटारांवर कडप्पे व लेंटल टाकून बंद केली आहेत. त्यामुळे गटारांची साफसफाई करणेही कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. पावसाचे पाणी गटारांमध्ये न जाता बाजारपेठेत पसरत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये व पावसाचे पाणी नद्यांमध्ये सहज वाहून जावे यासाठी गटारे मोकळी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला असून, येत्या दोन दिवसात गटारांवरील अतिक्रमण काढण्यास सुरवात होणार आहे. दुकानात जाता यावे यासाठी एखादा कडप्पा ठेवण्याचीही मुभा दिली जाणार आहे. या मोहिमेत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेले बांधकामही तोडले जाणार आहे. त्यामुळे साहजिकच बाजारपेठ मोकळी होणार असल्याने त्याचा वाहतुकीलाही फायदा होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com