संगमेश्वरसाठी ४० हजार पुस्तके प्राप्त

संगमेश्वरसाठी ४० हजार पुस्तके प्राप्त

संगमेश्वरसाठी ४० हजार पुस्तके प्राप्त
साडवली, ता. २ : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. संगमेश्वर तालुक्याला ४० हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. ही पुस्तके दोन दिवसात केंद्र शाळेत दिली जाणार आहेत.
शासनाने विद्यार्थ्यांचे दप्तरचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेला सर्व विषयांचे एक पुस्तक अशी वर्षाला चार पुस्तके चार टप्प्यात दिली जाणार आहेत. त्यानुसार तालुक्यात मराठी, सेमी व उर्दू माध्यमाची पुस्तके प्राप्त झाली. यात एका टप्प्यासाठी मराठी माध्यम पहिलीसाठी ७०० पुस्तके, दुसरी-९००, तिसरी-८६०, चौथी-१ हजार ३६५, पाचवी-५४०, सहावी-७७०, सातवी-८६० व आठवीसाठी १ हजार १५० पुस्तके अशी चारही टप्प्याची प्राप्त झाली. सेमीसाठी पहिलीला २२५, दुसरी-२५०, तिसरी-२४०, चौथी-२८०, पाचवी-५८०, सहावी-६००, सातवी- ७६० आठवीसाठी ६७० पुस्तके मिळाली आहेत.
उर्दू माध्यमाच्या तालुक्यात १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळा आहेत. यातील विद्यार्थ्यांसाठीही पुस्तकांची मागणी करण्यात आली. यानुसार पुस्तके प्राप्त झाली आहेत. तालुक्याला एका टप्प्याची १० हजार अशी चार टप्प्याची ४० हजार पुस्तके तालुक्याला मिळाली असून, येथून केंद्रशाळा व तेथून प्रत्येक शाळेत व शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com