बियाणे, खते खरेदीसाठी 
देवगडमध्ये लगबग दिसेना

बियाणे, खते खरेदीसाठी देवगडमध्ये लगबग दिसेना

बियाणे, खते खरेदीसाठी
देवगडमध्ये लगबग दिसेना

तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची अजूनही हुलकावणी आहे. त्यामुळे शेतकरी भात बियाणे खरेदी करण्यासाठी अजून धांदल करताना दिसत नाहीत. वळवाचा दमदार पाऊस बरसल्यावर आपोआपच शेतकरी जमिन नागंरणीच्या कामाला लागतील. मात्र, सद्यस्थितीत सर्वच बाबतीत पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील प्रमुख विक्रेत्यांकडे भात बियाणे, खते येऊन दाखल झाली आहेत. मात्र, अजून मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी नसल्याने बाजारात मागणीचा शुकशुकाट आहे. आंबा हंगाम आता संपत आला आहे. त्यामुळे बागायतदारांनी आपली आवराआवर केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी अजून कामाला लागलेले नाहीत. आंबा बागायतदारांचीही मशागतीचे कामे आहेत. परंतु, त्यांनाही पावसाची प्रतीक्षा आहे. अद्याप तालुक्यात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला नसल्याने जमिन ओली झालेली नाही. अशावेळी नांगरणी करण्यामध्ये अडचणी येत आहेत. पाऊस झाल्यावर नांगरणीच्या कामाबरोबरच बियाणे खरेदीसाठी लगबग वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com