मतमोजणीनंतर शांतता राखण्याचे आवाहन

मतमोजणीनंतर शांतता राखण्याचे आवाहन

87428

नागरिकांनो, मतमोजणीनंतर शांतता राखा

पोलिस प्रशासनाचे आवाहन ः सावंतवाडीत शांतता समितीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर समाजात तणाव, शांतता भंग होईल असे कुठे वातावरण असेल तर पोलिसांना माहिती दिली तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य आपल्या सहकार्याने करता येईल, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. अंमली पदार्थ, गोवा बनावट दारूची माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले.
येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी नरनावर, शांतता समिती सदस्य माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, पत्रकार सिताराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, ऑगोस्तीन फर्नांडिस, हिदायततुल्ला खान, काँग्रेसचे तौकीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. काही भागात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान झाले. मतदानापूर्वी वाद विकोपाला गेले. त्यामुळे मतमोजणी नंतर गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगितले. त्यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलिस निरीक्षक तानाजी नरनावर म्हणाले, सोशल मीडियावरून कोणीही अफवा पसरवू नये. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले तर पोलिस कारवाई करतील. मतमोजणीनंतर गालबोट लागू नये म्हणून सर्वांना आमचं आवाहन आहे, त्यांनी याबाबत काही कुणकुण लागली तर पोलिसांना माहिती द्यावी. मतमोजणीनंतर समाजात वाद विवाद होणार नाही, अशी भूमिका प्रत्येक सजग नागरिकांनी घ्यावी.’’
---
...तर पोलिसांना माहिती द्या
पोलिस अधिकारी म्हणाले, ‘‘शांतता भंग होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष असले पाहिजे म्हणून बेकायदेशीर दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष असले पाहिजे. गोवा बनावट दारूची खुलेआम विक्री सुरू असून अंमली पदार्थ देखील सराईतपणे विक्री होत आहेत. लोकसभा निवडणूक मतदान मोजणीनंतर गालबोट लागू नये म्हणून सर्वांनी शांतता अबाधित राहावी म्हणून दक्षता घ्यावी. तसेच कुठं काही घडणार असेल तर पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे.’’ दरम्यान, काळ्या काचा असणाऱ्या चार चाकी गाड्या तपासल्या जाव्यात, अशी मागणी या चर्चेत करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com