चाकरमानी परतीच्या प्रवासाला

चाकरमानी परतीच्या प्रवासाला

चाकरमानी परतीच्या
प्रवासाला, आरक्षण फुल्ल

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ ः तालुक्याच्या विविध भागात उन्हाळी हंगामाच्या निमित्ताने आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. येत्या काही दिवसात शाळा सुरू होणार असल्याने चाकरमान्यांनी परतीचा मार्ग धरला आहे. त्यामुळे गाड्यांचे आरक्षण सध्या ‘फुल्ल’ झाले आहे. तर काहींनी रेल्वे तसेच खासगी आराम गाड्यांनी जाण्याचे नियोजन केल्याचे चित्र आहे.
वाढता उकाडा, पाणी टंचाई यामुळे चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागला. साधारणतः दहावी बारावी तसेच उर्वरित शालेय परीक्षा संपल्यावर टप्याटप्याने चाकरमानी गावाकडे येतात. काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून तर काहीजण खासगी गाड्या घेऊन येतात. त्यामुळे तालुक्यात चाकरमान्यांची रेलचेल होती. चाकरमान्यांची वाहने गावागावात फिरताना दिसत होती. विवाह आधी धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने चाकरमान्यांची उपस्थिती असते. मात्र, मध्यंतरी लोकसभा निवडणूक दरम्यान मुंबईमधील मतदानावेळी काही चाकरमानी मुंबईत परतले. त्याअनुषंगाने आधीच नियोजन करून चाकरमानी गावाकडे आले होते. तर काहीजण मतदान झाल्यानंतर गावाकडे आले आहेत. काही चाकरमानी मुंबईतील मतदानाला जावून पुन्हा गावी आल्याचेही चित्र होते. मात्र, सद्यस्थितीत वाढता उकाडा आणि टंचाईची झळ यामुळे चाकरमानी काहीसे अस्वस्थ होते. अजून तालुक्यात मान्सुनपूर्व पाऊस बरसलेला नाही. किनारी भागात हलका पाऊस झाला. मात्र, टंचाई मिटवण्याएवढा पाऊस झाला नसल्याने गावागावात टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आता शाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रवेश, शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीच्या निमित्ताने चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. यासाठी एसटी आगाराने नियमित गाड्यांबरोबरच काही जादा गाड्यांचेही नियोजन केले आहे. मात्र सद्यस्थितीत गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. त्यामुळे चाकरमानी परतच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रवाशांना आरक्षण मिळाले नाही अशी चाकरमानी मंडळी पुणे मार्गे तसेच रेल्वेने मुंबई गाठत आहेत. काहीजण खासगी आराम गाड्यांचा आधार घेत आहेत. आता मान्सुनला केव्हाही सुरूवात होईल, अशी अवस्था आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी त्यादृष्टीनेही परतीचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे.
..............
चौकट
निकालाची उत्सुकता
मंगळवारी (ता.४) लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशी निगडित असलेले चाकरमानी मुंबईकडे रवाना होत आहेत. निकालादिवशी आपल्या भागातील विजयी उमेदवाराचा जल्लोष करण्याचा मनसुबा असल्याने चाकरमान्यांनी परतीचा मार्ग धरल्याचेही चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com