विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तकं

विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तकं

विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तकं

शिक्षण विभाग सज्ज ; जिल्ह्यात १ लाख ४ हजार १५६ विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १५ जूनला सुरु होत आहेत. पहिल्या दिवशी पुस्तक दिन साजरा करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील १ लाख ४ हजार १५६ मुलांसाठी ३ लाख ७८ हजार पुस्तके मिळाली आहेत. ही पुस्तके तालुकास्तरावर मिळाली असून सध्या शाळास्तरावर वितरण करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.
पहिली ते आठवीमध्ये शिक्षणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये, त्याला पुस्तकाअभावी शिक्षणात अडचणी येवू नये. त्याचबरोबर शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १०० टक्के उपस्थिती टिकवणे, गळतीचे प्रमाण शुन्यावर आणणे. यासाठी समग्र शिक्षणांतर्गत काही वर्षांपूर्वी मोफत पाठ्यपुस्तके योजना सुरु केली आहे. या शासकीय योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर नवे शैक्षणिक वर्षे १५ जूनपासून सुरु होत आहे. जिल्ह्यातील इ. पहिली ते आठवी च्या एकूण १ लाख ४ हजार १५६ विद्यार्थ्यांना एकूण ३ लाख ७८ हजार पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक वितरणचा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना राज्यशासनाने दिल्या आहेत. त्याकरिता बालभारती कोल्हापूर यांच्याकडून गेल्या आठवड्यात तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पोहोच करण्यात आली आहेत. सध्या तालुकास्तरावर माध्यमनिहाय, इयत्तानिहाय, विषयनिहाय पाठ्यपुस्तकांची विघटवारी करून शाळास्तरावर वितरीत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com