दाभोळ-रायगडमधील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

दाभोळ-रायगडमधील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

रायगडमधील मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
किशन जावळे ; मतदारसंघनिहाय स्वतंत्र टेबल
दाभोळ, ता. ३ : रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलिबाग येथे सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रायगड लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात होईल.
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत.
पेण, अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी १४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी प्रत्येकी २७ फेऱ्या होणार आहेत.
अलिबागसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीच्या 27 फेऱ्या होतील. श्रीवर्धनसाठई २६, महाडसाठी २९, दापोलीसाठी २७, गुहागरसाठी २३ फेऱ्या होणार आहेत.
टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी एकूण १ हजार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे.

चौकट
रायगडमध्ये ६०.५१ टक्के मतदान
रायगड लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी २ हजार १८५ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. या निवडणुकीमध्ये एकूण ६०.५१ टक्के मतदान झाले होते. त्यात पेण ६४.५१ टक्के, अलिबाग ६६.६७, श्रीवर्धन ५९.२०, महाड ५७.५६, दापोलीत ५७.३७ आणि गुहागरमध्ये ५६.४४ टक्के मतदान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com