देवगड किनारी
दमदार पाऊस

देवगड किनारी दमदार पाऊस

Published on

देवगड किनारी दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः तालुक्याच्या किनारी भागात आज सकाळी दमदार पावसाची सर बरसली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीवेळ दिलासा मिळाला; मात्र सर पडून गेल्यावर पुन्हा कडक ऊन पडले आणि उकाड्याची तीव्रता आणखी वाढली. अनेक दिवस मॉन्सूनपूर्व पाऊस येथे हुलकावणी देत होता. असे असताना आज सकाळी दहाच्या सुमारास सुमारे अर्धातास दमदार पावसाची सर कोसळली. यामुळे सर्वत्र पाणी झाले. उष्णतेने होरपळलेल्या मातीलाही पाणी मिळाले. नागरिकांनाही उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला; मात्र हा आनंद क्षणभंगूर ठरला. पावसानंतर पुन्हा ऊन तापू लागले आणि अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com