रत्नागिरी-निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची तालीम

रत्नागिरी-निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणीची तालीम

-rat३p२४.jpg
87564
रत्नागिरी ः एफसीआय गोडाऊनमध्ये होणाऱ्या मतमोजणीची जिल्हा प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेतली.

मतमोजणीची रत्नागिरीत रंगीत तालीम

निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती; मतमोजणीसाठी शुभेच्छा

रत्नागिरी, ता. ३ : येथील मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात मंगळवारी (ता. ४) मतमोजणी होणार आहे. त्याची रंगीत तालीम निवडणूक निरीक्षक भुवनेशप्रताप सिंह व रेवती यांच्या उपस्थितीत आज झाली. आचारसंहितेपासून सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. मतमोजणीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांचे योगदान आवश्यक आहे. दिलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल, त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दांत निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्गचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आदी उपस्थित होते. श्री. गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. अत्यंत सविस्तरपणे उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणीचे प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह म्हणाले, ‘तुम्हा सर्वांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे सर्वांनी चांगले काम केले आहे. मतमोजणी संदर्भात अडचणी, शंकांचे निरसन केले जाईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com