भूसंपादनाविना धरणाचे 
काम केल्याचा आरोप

भूसंपादनाविना धरणाचे काम केल्याचा आरोप

भूसंपादनाविना धरणाचे
काम केल्याचा आरोप
बांदा, ता. ३ ः फुकेरी येथील धरणाचे काम भूसंपादन न करताच केल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी प्रशासनाला पत्र पाठवत दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी येथील धरणाच्या कामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. काम सुरू झाल्यानंतर धरणाचे ७५ टक्के काम पूर्ण करण्यात आले. धरणाचे काम निम्म्यापेक्षा अधिक झाले असताना चार वर्षांनंतर उपजिल्हाधिकारी, भूसंपादन यांनी जमीनमालकांना २ मे रोजी भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. जमीनमालकांनी १० जूनपर्यंत या संदर्भात आक्षेप नोंदवायचे आहेत. भूसंपादन न करता धरणाचे काम करण्यात आले. हे काम बेकायदेशीरपणे करण्यात आले असून, या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ते कल्याणकर यांनी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना पत्र पाठवून हे काम थांबवून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com