भरधाव मोटारीने तिघांना उडविले, सहा जखमी

भरधाव मोटारीने तिघांना उडविले, सहा जखमी

सुधारीत..........
०००००००००००००००००००००००००

87596
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाजवळ सायबर चौकात सोमवारी दुपारी भरधाव मोटारीने तीन दुचाकींना उडविले. त्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेजवरून घेतलेला क्षण.
87572
कोल्हापूर ः सायबर चौकात झालेल्या अपघातात मोटारीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

भरधाव मोटारीच्या धडकेत चार ठार
कोल्हापुरात भीषण अपघात; तीन दुचाकींना उडविले, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठजवळील सायबर चौकात आज भरदुपारी भरधाव मोटारीने तीन दुकाकींना उडविले. त्यात मोटारीचे चालक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व्ही. एम. ऊर्फ वसंत मारुती चव्हाण (वय ७२, रा. वैभव सोसायटी, शाहू टोल नाक्याजवळ, कोल्हापूर) यांच्यासह चौघे ठार झाले. हर्षद सचिन पाटील (१६, रा. दौलतनगर), त्याचा भाऊ प्रथमेश (१९), अनिकेत आनंदा चौगुले (रा. पोर्लेतर्फ ठाणे, ता. पन्हाळा) अशी अन्य मृतांची नावे आहेत. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.
अपघातात जयराज संतोष पाटील (१९, दोघे मूळ रा. आसळज, ता. गगनबावडा, सध्या दौलतनगर), मयूर मारुती खोत (२४, चांदेकरवाडी, ता. राधानगरी), धनाजी शंकर कोळी (४४), शुभांगी धनाजी कोळी (३८), आणि समर्थ पंकज पाटील (एक वर्ष, सर्व कणेरीवाडी, ता. करवीर) जखमी झाले आहेत. यातील कोळी दांपत्यासह समर्थ किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. मयूर खोत याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानेही खासगी रुग्णालयात उपचार घेतले. अन्य जखमींना सीपीआर आणि खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राजाराम कॉलेजकडून भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने बंद असलेल्या सायबर सिग्नल चौकात तीन दुचाकींना उडविले. यामध्ये तिघे ठार झाले, तर उर्वरीत सहाजण जखमी झाले. जखमीत एक वर्षाचा मुलगा बचावला. आज दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी अपघात झाला. परिसरातील सीसीटीव्हीत अपघात कैद झाला आहे. धडक इतकी वेगाने होती की त्या परिसरातील सिग्नलचा खांब, पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचा खांबही जमीनदोस्त झाला. घटनास्थळी गर्दी होती. सिग्नल परिसरातून थेट रस्त्याच्या बाजूला मोटार गेल्यामुळे अन्य प्रवासी थोडक्यात बचावले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, राजाराम कॉलेज समोरील उतारावरून मोटार वेगाने आली होती. काही क्षणात मोटारीने बंद असलेल्या सायबर सिग्नलवरून जाणाऱ्या चार दुचाकींना उडवले. तेथून मोटार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिग्नल आणि पब्लिक ॲड्रेस सिस्टीमच्या खांबावर जाऊन आदळली. यामुळे मोठा फटाका फोडल्यासारखा आवाज झाला. परिसरातील वडापाव गाड्यावरील नितीन मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, व्यापारी धावतच घटनास्थळी पोचले. यावेळी मोटारीतील चालकाला तेथून बाहेर काढताना त्याच्या डोळ्यावर पूर्वीच ड्रेसिंग पट्टी होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते, असे दिसले. अपघात झाल्यानंतर ते जिवंत होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. स्थानिकांनी मोटारीचा दरवाजा उघडल्यानंतर ते सीटवरून बाजूला कोसळले.
मोटारीने धडक दिल्यानंतर तेथील दुचाकीवरून फरफटत गेलेल्यांची शोधाशोध सुरू झाली. त्यापैकी एकजण शेजारीच असलेल्या एका खुल्या टेंपोत जाऊन पडला होता. उर्वरित रस्त्यापासून सुमारे ८० ते १०० फुटांवर पडलेले होते. त्यांना एकत्रित करून तातडीने राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांना सीपीआरमध्ये दाखल केले. येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली. पोलिसांना यायला पंधरा मिनिटांहून अधिक कालावधी लागला. रुग्णवाहिकाही वेळेवर पोचली नाही. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली. नेमका कोण जखमी आहे, त्यांची ओळख पटविण्यासाठीही धावाधाव करावी लागली, असेही स्थानिकांनी संगितले.
घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला. पोलिसांनी वाहनधारकांची गर्दी हटवत वाहतूक सुरळीत केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिसही घटनास्थळी थांबून होते.

अपघातानंतर दुचाकीस्वार हवेत उडाले
भरधाव मोटारीने चौकातील चार दुचाकीस्वारांना उडविले. त्यापैकी साधारण दहा-पंधरा फूट उंच हवेत फेकले गेले. अन्य दुचाकीसह फरफटत गेले. चौकात बाजूला असलेल्या सिग्नलच्या खांबावर ठोकरल्यामुळेच मोटार थांबली. यावेळी याच परिसरात मोठे बांधकाम सुरू आहे. खांब नसते, तर मोटार थेट बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात गेली असती. मोटारीने धडक दिलेल्या तीन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. अपघाताचा थरार पाहणाऱ्यांनी तातडीने मदत केल्यामुळे काही जखमींवर तातडीने उपचार होऊ शकले.


व्हिडिओ व्हायरल...
सायबर चौकात झालेल्‍या अपघाताचा सीसीटीव्हीतील व्हिडिओ दीड-दोन तासांत व्हायरल झाला. सीपीआर परिसरात झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही अनेकजण मोबाईल स्क्रिनवर तो व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त करीत होते. व्हिडिओ पाहून अनेकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. अपघाताची तीव्रता व्हायरल व्हिडिओमुळे काही मिनिटांत राज्यभर पसरली.
------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com