रत्नागिरी-आरे-वारे जंगल भागात वणवा

रत्नागिरी-आरे-वारे जंगल भागात वणवा

87612
87613

आरे-वारे जंगल भागात वणवा
अनर्थ टळला ; गणपतीपुळे देवस्थानकडून मिळाले पाणी
रत्नागिरी, ता. ३ः गणपतीपुळे पर्यटनस्थळाजवळील आरे-वारे मार्गावर रस्त्याशेजारी जंगल भागात वणवा लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गणपतीपुळे देवस्थानमधून सुत्र हलली. देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी पाणी मागवून ती आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा प्रकार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या आगीत आसपासची झाडं भस्मसात झाली.
आरे-वारे मार्गावर गणपतीपुळे देवस्थानपासून काही अंतरावरील एका खासगी हॉटेलच्या बाहेरील बाजूस मुख्य रस्त्याशेजारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. आगीचे रुपांतर वणव्यात झाले. उन्हामुळे गवत आणि झाडेझुडपं चांगलीच वाळलेली असल्याने आग सगळीकडे पसरत गेली. यामध्ये येणारा सगळा भाग जळून जात होता. त्याचवेळी देवस्थानच्या कार्यालयात दूरध्वनीवरून आग लागल्याची माहिती देण्यात आली.
ही माहिती मिळाल्यानंतर देवस्थानचे कर्मचारी मिलिंद पडवळे यांनी तातडीने अक्षय सुर्वे, हेमंत गवाणकर, संदीप माने आणि सूरज वाळवे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी आगीचे स्वरूप पाहून, पाण्याची गाडी मागवली. गाडी आल्यानंतर सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. झाडाच्या फांद्यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केला. यामध्ये काही झाडे भस्मसात झाली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com