नाटळ ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी

नाटळ ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी

नाटळ ग्रामसभेत
हाणामारी; सात जखमी
परस्परविरोधी फिर्याद दाखल

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : नाटळ (ता. कणकवली) ग्रामसभेत आज भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. दुपारी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सातजण जखमी झाले आहेत. या सर्वांना कणकवली उपजिल्‍हा रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाटळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आज सकाळी अकराला सरपंच सुनील घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. यावेळी ग्रामसेवक तेंडुलकर यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुपारी साडेअकराच्या सुमारास तंटामुक्‍ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत यांनी ३१ मे रोजीच्या गामपंचायत बैठकीत तंटामुक्‍त अध्यक्षांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्याबाबत विषय उपस्थित झाला होता. त्‍यावर चर्चा करा, असे म्‍हणणे मांडले. या मुद्द्यावर ग्रामसभेत वादंग झाला. यानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यात प्लास्टिक खुर्च्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली.
मारहाणीमध्ये भाजपचे महेंद्र भास्कर गुडेकर, दीनानाथ पंढरीनाथ सावंत, किशोर विठ्ठल परब तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रदीप वसंत सावंत, पद्माकर पांगम, ऋषिकेश मारुती सावंत आणि गणेश मारुती सावंत जखमी झाले. मारहाणीनंतर सर्व जखमींना कनेडी येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्‍यानंतर कणकवली उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्‍याची बाब समजताच कणकवलीतील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल झाले होते. कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्यासह पोलिसांनीही उपजिल्‍हा रुग्‍णालयात धाव घेतली. या घटनेनंतर नाटळ गावात अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com