पोलिसांची मोटार, आराम बस 
अपघातात चार पोलिस जखमी

पोलिसांची मोटार, आराम बस अपघातात चार पोलिस जखमी

पोलिसांची मोटार, आराम बस
अपघातात चार पोलिस जखमी

फोंडाघाटातील घटना, गुन्हा दाखल

कणकवली, ता. ३ : फोंडाघाटामध्ये आज पोलिसांची मोटार आणि खासगी आराम बसमध्ये झालेल्या अपघातात चार पोलिस जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
सिंधुदुर्ग पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक ओरोस ते कोल्‍हापूर असे जात होते. फोंडाघाट येथील वळणावर कोल्‍हापूर ते गोवा जाणाऱ्या आराम बसची पोलिसांच्या मोटारीला धडक बसली. यात गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलिस श्री. पाडाळकर, श्री. कदम, श्री. निवतकर आणि चालक तृप्ती मुळीक हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व कणकवली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. तत्पूर्वी फोंडाघाट येथील चेतन चायनीज सेंटरचे मालक ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी जखमींना उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. या अपघात प्रकरणी कृष्णकांत प्रभाकर कदम (वय ५४) यांनी खासगी आराम बस चालक प्रेम रामकिशोर सिंग (वय ३६ रा. बचेडी- राजस्थान) याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्‍यानुसार चालक प्रेम सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com