शासकीय वसतिगृहांत
प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय वसतिगृहांत
प्रवेश प्रक्रिया सुरू
कणकवली ः देवगड व कणकवली तालुक्यांतील शासकीय वसतिगृहांत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. देवगड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या मागील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह व कणकवली तालुक्यातील डॉ. आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहात या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवीपासून कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालय व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृह प्रवेश हा रिक्त जागा व प्रवर्गनिहाय, गुणवत्तेनुसार असेल. वसतिगृहात विनामूल्य निवास, भोजन, ग्रंथालयीन पुस्तके व अन्य सुविधा, आर्थिक सहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता सुविधा पुरविण्यात येणार आहेत. इच्छुकांनी वसतिगृहातून विनामूल्य प्रवेश अर्ज घेऊन जावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे व वसतिगृह अधीक्षकांनी केले आहे.
--------------
कुडाळात रविवारी
मूर्तिकारांना धडे
सावंतवाडी ः खास मूर्तिकारांच्या आग्रहास्तव लग्धा (पर्यावरणपूरक) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा श्रीगणेश मूर्तिकार संघातर्फे केले आहे. ज्या मूर्तिकारांना या प्रशिक्षणाची गरज वाटत असेल, त्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. ७) नावनोंदणी करावी, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष बापू सावंत यांनी केले आहे. प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करण्याच्या दृष्टीने अगोदर प्रशिक्षकांची संख्या समजणे आवश्यक असल्याने अगोदर नोंदणी होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण कालावधीत चहा नाश्ता व जेवण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण रविवारी (ता. ९) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संदीप मेस्त्री यांची नरसिंह आर्ट चित्रशाळा, कुडाळ-लक्ष्मीवाडी, कुडाळ नवीन बसस्थानक नजीक लक्ष्मीमंदिराजवळ येथे होणार आहे. नावनोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन बापू सावंत यांनी केले आहे.
-----
आरोग्य शिबिरास
कणकवलीत प्रतिसाद
कणकवली ः येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या सभागृहात लायन्स क्लब ऑफ कणकवलीच्या विद्यमाने छोटेखानी ब्लडप्रेशर आरोग्य शिबिर नुकतेच झाले. शिबिराचा ३५ रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात डॉ. बी. एस. म्हाडेश्वर, डॉ. शमिता बिरमोळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ कणकवलीचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे, सचिव ऋषिकेश कोरडे, प्रा. दिवाकर मुरकर, महेश काणेकर, सौ. कोरडे, सिद्धार्थ तांबे, ग्लेन मार्क फार्मास्युटिकल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. कंपनीचे डिस्टिक्ट सेल्स मॅनेजर विनायक भोकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. फार्मा कंपनीचे फिल्ड सेल्स ऑफिसर भूषण तवटे यांनी आभार मानले.
--------------
मसुरे येथे आज
धार्मिक कार्यक्रम
मसुरे ः मसुरे-दत्तवाडी येथे उद्या (ता. ५) श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ८ ते १० यावेळेत श्री दत्तगुरूंची पूजा-अर्चा, सकाळी ११ वाजता समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत भजने, रात्री ९.३० वाजता वालावलकर दशावतार नाट्य कंपनीचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ बागवे संस्थानने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com