-रथ मांगल्याचा पुस्तक प्रत्येक घरात पोचले पाहिजे

-रथ मांगल्याचा पुस्तक प्रत्येक घरात पोचले पाहिजे

-rat४p१५.jpg -
२४M८७७८१
हर्णै ः डॉ. दशरथ भोसले यांचे ''रथ मांगल्याचा'' या पुस्तकाचे प्रकाशन करताना उपस्थित सर्व मान्यवर.
------------

‘रथ मांगल्याचा’ पुस्तक प्रत्येक घरात पोहचवा

डॉ. सदानंद मोरे ः डॉ. दशरथ भोसलेंच्या पुस्तकाचे कौतुक

सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. ४ ः लेखक डॉ. दशरथ भोसले यांचे ''रथ मंगल्याचा'' पुस्तक प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे, असे मत डॉ. सदानंद मोरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
''रथ मांगल्याचा'' पुस्तक एक पती आपल्या पत्नीबद्दल लिहितो आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत गृहिणीला कधी बरोबरीचा सन्मान दिला जात नाही. किंबहुना गृहिणी या नात्याने तिच्या संसारातील योगदानाबद्दल हेटाळणीच केली जाते. लेखक डॉ. दशरथ भोसले यांनी आपल्या पत्नीने संसारात पार पडलेल्या जबाबदाऱ्या, मुलांच्यावर केलेले संस्कार, नातेवाईक, सासरची-माहेरची सारी कुटुंबे आपल्या प्रेमळ वागणुकीणे एकसंध ठेवली. पत्नीने केलेले संस्कार, पतीच्या उच्च शिक्षणासाठी केलेले समर्पण वाखाणण्यासारखे आहे. वयाच्या ७७व्या वर्षी डॉ. भोसले हे पुस्तक लिहितात, ही बाब कौतुकास्पद आहे. हे पुस्तक संस्कारांचा ठेवा म्हणून प्रत्येक घरात वाचले गेले पाहिजे, असे उद्गगार डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
पुस्तकाचे लेखक डॉ. दशरथ भोसले यांनी वयाच्या ७५व्या वर्षी मराठी विषयात पीएचडी संपादन केली, ही बाब खूपच कौतुकास्पद आहे. त्यांनी पीएचडीसाठी निवडलेला विस्थापन हा विषय समाजाच्यादृष्टीने आहे, जिव्हाळ्याचा आहे. डॉ. भोसले यांनी सादर केलेल्या प्रबंधावर एखादे पुस्तक तयार होणे गरजेचे आहे, असे विचार डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. अमोलिका मगर या छोट्या मुलीने डॉ. भोसले यांचे काढलेले सुंदर पोट्रेट अध्यक्ष डॉ. मोरे यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना प्रदान केले.
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com