राजापुरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम अर्धवट

राजापुरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम अर्धवट

-rat3p22.jpg-
24M87804
राजापूर ः सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम संथगतीने सुरू आहे.
----------

राजापुरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम अद्याप अर्धवट

जनतेची गैरसोय ; पावसाळ्यापूर्वी काम होणे गरजेचे
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. ४ ः राजापूर नगरपालिका इमारतीलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम अद्यापही अर्धवट आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय होत आहे.
या स्वच्छतागृहाची इमारत कोसळून त्या जागी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जनतेच्या सोयीसाठी कोदवली नदीपात्रात तात्पुरच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.

राजापूर नगरपालिकेच्या इमारतीला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम अद्यापही अर्धवट आहे. मात्र गेली चार महिने होत आले तरी इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह व्यापारी व शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. पाऊस कोकणच्या वेशीवर आला आहे. त्यामुळे कोदवली नदीपात्र पाण्याने दुथडी भरणार आहे. अशावेळी कोदवली नदीपात्रातील तात्पुरचे स्वच्छतागृह हटविण्यात येईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नव्या स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत स्वच्छतागृहाच्या कामाची गती पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृह जनतेसाठी खुले होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे याचा त्रास बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय वाढणार आहे. याचा विचार प्रशासनाने करून तातडीने सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या कामाची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
-----
कोट
पालिका प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून जनतेची गैरसोय दूर करावी.
--अजीम जैतापकर, शहराध्यक्ष, राजापूर काँग्रेस

-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com