रायगडमध्ये तब्बल २७ हजार २७० मते नोटाला

रायगडमध्ये तब्बल २७ हजार २७० मते नोटाला

रायगडमध्ये २७ हजार २७० मते नोटाला

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ५ : रायगड लोकसभा निवडणुकीत १० लाख १३ हजार २७२ मतांची मोजणी करण्यात आली. त्यात तब्बल २७ हजार २७० मतदारांनी नोटाला मत दिल्याचे दिसून आले. त्यामध्ये पेण मतदार संघात ५ हजार ९७६, अलिबागमध्ये ४ हजार ८५५, श्रीवर्धन मतदार संघात ३ हजार ३२२, महाडमध्ये ३ हजार ६१३, दापोलीमध्ये ४ हजार ७६१, गुहागरमध्ये ४ हजार ६६१ मतदारांचा समावेश आहे. टपाली मतदान केलेल्या मतदारांपैकी ८२ जणांनी नोटाला मतदान केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रायगड मतदार संघातून सुनील तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी झाले. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनंत गीते यांना पराभूत करून विजय मिळवला. जिल्हा क्रीडासंकूल येथे सकाळी ८ वा. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाली. २९ फेऱ्‍यांमध्ये ही मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
लोकसभा निवडणुकीत मतमोजणी झालेल्या एकूण १० लाख १३ हजार २७२ मतांपैकी उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी ः अनंत गीते- ४ लाख २५ हजार ५६८ मते, सुनील तटकरे- ५ लाख ८ हजार ३५२, कुमोदिनी रवींद्र चव्हाण- १९ हजार ६१८, श्रीनिवास मट्टपरती- ९ हजार ३९४, श्रीपाल कवाडे- ५ हजार ६३४, अनंत बाळोजी गीते (अपक्ष)- ३ हजार ५१५, नितीन मयेकर- २ हजार ५६०, पांडुरंग दामोदर चौले- २ हजार ४१७, अनंत पद्मा गीते (अपक्ष)- २ हजार ४०, प्रकाश बाळकृष्ण चव्हाण- १ हजार ९३९ मते, मंगेश पद्माकर कोळी- १ हजार ८२०, अजय यशवंत उपाध्ये- १ हजार ७९५, अंजली अश्विन केळकर- १ हजार ३५०. नोटा २७ हजार २७० मते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com