मॉन्सून सिंधुदुर्गच्या उंबरठ्यावर

मॉन्सून सिंधुदुर्गच्या उंबरठ्यावर

87969

मॉन्सून सिंधुदुर्गच्या उंबरठ्यावर
प्रतिक्षा संपणारः गोव्यात झाला प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ४ः केरळमध्ये एक दिवस अगोदर दाखल झालेला मॉन्सून आज गोव्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे रात्री उशिरा किंवा उद्या (ता. ५) सकाळपर्यंत मॉन्सून गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करेल, अशी शक्यता असून, त्यामुळे आता सिंधुदुर्गवासीयांची पावसाची प्रतीक्षा संपणार आहे.
केरळमध्ये ३१ मे रोजी दाखल होणारा मॉन्सून एक दिवस अगोदर म्हणजे ३० मे रोजी दाखल झाला. अरबी समुद्रातून मॉन्सूनचा वेग कायम असून, सोमवारी मॉन्सूनने कर्नाटकपर्यंत मजल मारली होती; परंतु आज सायंकाळी मॉन्सून गोव्यात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. सिंधुदुर्गच्या वेशीवर आल्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत मॉन्सून जिल्ह्यात दाखल होईल, असा अंदाज आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सदृश वातावरण आहे. तापमान ३५ ते ३६ अंश सेल्शियसपर्यंत असून, ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा सुरू आहे. उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. याशिवाय बळीराजा देखील खरीप हंगामासाठी सज्ज असून, त्याला देखील मॉन्सूनची आस लागली आहे. यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या; परंतु उष्म्याच्या झळा अजिबात कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वांनाच मॉन्सूनची प्रतीक्षा आहे. आता ही प्रतीक्षा आता संपणार असून, कोणत्याही क्षणी मॉन्सून सिंधुदुर्गात दाखल होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com